अमृतसर (पंजाब) : रावणदहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी लोहमार्गावर गोळा झालेल्या लोकांना रेल्वेगाडीने चिरडल्याने किमान 61 जणांचा मृत्यू झाला, तर 72 जण जखमी झाले.
जोडा फाटक येथे लोहमार्गाच्या शेजारील मोकळ्या जागेत रावणदहनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. सुमारे 300 जण या कार्यक्रमासाठी जमले होते. कार्यक्रम सुरू असतानाच अनेक जण लोहमार्गावर गेले, त्याच वेळी जालंधरहून अमृतसरला भरधाव जाणाऱ्या रेल्वेगाडीने त्यांना चिरडले. अमृतसर विभागाचे उपविभागीय दंडाधिकारी राजेश शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात किमान 61 जण मृत्युमुखी पडले असून, 72हून अधिक जणांवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर घटनास्थळावर मृतदेहांचा खच पडला होता. मृतांमध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलांचाही समावेश आहे. अनेक मृतदेह ओळखूही येत नव्हते. “मी माझ्या चिमुकल्याला गमावले आहे. मला तो परत हवा आहे,’ असा एका मातेने फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता. या अपघातासाठी स्थानिक प्रशासन आणि दसरा समिती जबाबदार असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. दसऱ्याच्या काळात रेल्वे फाटकाच्या जवळून जाताना रेल्वेगाड्यांचा वेग कमी करण्याची विनंती गेल्या काही वर्षांपासून करण्यात येत आहे; मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली.
अधिक वाचा : मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक पॉल अॅलन यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी निधन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola