सोशल मीडियावरील #मीटू चळवळीमध्ये चार मुलींनी लैंगिक अत्याचार आरोप केल्यामुळे क्वान कंपनीचा संस्थापक अनिर्बान दास ब्लाह याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी वाशी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी सुरू आहे. अनिर्बान दास ब्लाह याच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाल्यानंतर त्याच्यावर सर्वच बाजूंनी टीका झाली होती. क्वान कंपनीने त्याच्याकडून सक्तीने राजीनामा घेतला होता. तसंच यामुळे क्वानचा भरपूर तोटाही झाला आहे.
फेसबुकवरून झालेली बद्नामी आणि आर्थिक तोटा यामुळे अनिर्बान डिप्रेशनमध्ये गेला होता. शुक्रवारी दुपारी १२च्या सुमारास वाशी पूलाच्या परिसरात तो संशयास्पद हालचाली करताना एका पोलीस हवालदाराला आढळला. त्याने इथे काय करतोय विचारलं असता असंच फिरायला आलो आहे असं उत्तर अनिर्बानने दिलं. नंतर वाशी पूलावरून तो उडी मारण्याचा प्रयत्न करत असता पोलिसांनी त्याला पकडलं आणि जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. ‘माझ्यावर झालेल्या आरोपांमुळे मी प्रचंड डिप्रेशनमध्ये आहे.यामुळेच मी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला’ अशी कबुली त्याने वाशी पोलिसांना दिली आहे.
अधिक वाचा : #MeToo : विपुल शहा ने माझा मानसिक, लैंगिक छळ केला- एल्नाज नौरोजी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola