काही दिवसांपूर्वी, कॉमेडियन, गीतकार आणि ‘सेक्रेड गेम्स’चा लेखक वरुण ग्रोवरचं नाव #MeToo मध्ये आलं आहे. आता ‘सेक्रेड गेम्स’मधील अभिनेत्री एल्नाज नौरोजीनेही आपल्या विचारांना वाट मोकळी करून दिली आहे. #MeToo मोहिमेंतर्गत एल्नाज नौरोजीने प्रसिध्द दिग्दर्शक विपुल शहा वर मानसिक आणि लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे.
एल्नाज नौरोजी म्हणाली, ‘नमस्ते इंग्लंड चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटात विपुलने मला प्रमुख भूमिका देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याकरिता त्याने मला ऑफिसमध्ये बोलावल्यानंतर मी गेले. जेव्हा करार करण्याची वेळ आली तेव्हा माझ्या व्यवस्थापकाला तुमची निवड होऊ शकत नाही अस सांगण्यात आलं. त्यानंतर मी पुन्हा विपुलला फोन केला. तेव्हा त्यानं तुला पुन्हा ऑडिशन द्यावं लागेल, असं सांगितलं. मी त्याच्या ऑफिसमध्ये गेले. त्यावेळी त्याने माझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. मी ज्या-ज्या वेळी त्याच्या ऑफिसमध्ये जायचे तेव्हा तो मला स्पर्श करायचा. मी त्याच्या घाणेरड्या मागणीकडे सतत दुर्लक्ष करत राहिले. दरम्यान मला ‘सेक्रेड गेम’मध्ये काम करण्याची संधी मिळाली. मी मी विपुलचा चित्रपट सोडला.’
अधिक वाचा : #MeToo : आलोकनाथ यांनी विनता नंदाविरुध्द दाखल केली मानहानीची तक्रार
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola