अकोला :- दि. १९ ऑक्टोबर २०१८ महावितरणच्या अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता तथा साहित्यीक डॉ.मुरहरी केळे लिखित ‘जगी ऐसा बाप’ व्हावा’ व‘नानी’ या दोन चरित्रग्रंथावरील परिसंवादाचे आयोजन एल.आर.टी. वाणिज्य महाविद्यालयाच्या सभागृहात रविवार २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५:३० वाजता केले आहे.
या परिसंवादाचे अध्यक्षस्थानी लोकसाहित्याचे अभ्यासक, संशोधक तथा महात्मा जोतीराव फुले अध्यासन केंद्र, सावित्रीबाई फुले विद्यापीठ,पुणेचे अध्यक्ष डॉ.विश्वनाथ शिंदे, प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समीक्षक व प्राध्यापक,मराठी विभाग,सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथील मा.डॉ.मनोहर जाधव उपस्थित राहणार आहेत. तर समीक्षक, वक्ते व गाडगे महाराज महाविद्यालय,मुर्तीजापूरचे माजी प्राचार्य डॉ.श्रीकांत तिडके व समीक्षक,कवी,वक्ते व विनायकराव पाटील महाविद्यालय,वैजापूर, जि. औरंगाबाद, येथील मराठी विभाग प्रमुख मा.डॉ.महेश खरात यांचेसह आदर्श महाविद्यालय, अकोलाचे माजी प्राचार्य बापुराव झटाले चरित्रग्रंथावर भाष्य करणार आहेत आहे. तरी या परिसंवादाला साहित्य रसिक व श्रोते यांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अधिक वाचा : जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीच्या सभेत वादळी चर्चा; निर्णय रद्दचा ठराव शासनाला देणार
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola