Denmark Open स्पर्धेत गुरुवारी महिला दुहेरीच्या गटात भारताच्या जोडीने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अश्विनी पोनप्पा – सिक्की रेड्डी या अनुभवी जोडीने ७व्या मानांकित कोरियाच्या ली एस-एच आणि शीन एस-सी या जोडीला १८-२१, २२-२०,२१-१८ असे पराभूत केले.
कोरियन जोडीने पहिला गेम १८-२१ अशा फरकाने जिंकला. त्यांचा खेळ अत्यंत आक्रमक होता. पण भारतीय जोडीने हार मानली नाही. दुसऱ्या गेममध्ये जोरदार कमबॅक करत भर्तरीय जोडीने तो गेम २२-२० असा जिंकला आणि सामना बरोबरीत आणला. त्यानंतर पुढील गेम अटीतटीचा होणार हे अपेक्षितच होते. त्यानुसार सामना चांगलाच रंगला. अखेर शेवटी भारतीय जोडीने तिसरा गेम २१-१८ असा जिंकत सामना खिशात घातला. आता त्यांचा सामना अव्वल मानांकित फुकुशिमा आणि हीरोता या जोडीशी होणार आहे.
अधिक वाचा : विजय हजारे ट्रॉफीत खेळण्यास धोनी चा नकार
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola