हिवरखेड(प्रतिनिधी) : हिवरखेड येथे डॉ प्रशांत इंगळे यांच्या दवाखान्यात आदर्श शिक्षक स्व भरत रावजी इंगळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्री सत्य साई सेवा संघटना अकोला; दमानी नेत्र रुग्णालय अकोला यांचे संयुक्त विद्यमाने; रोटरी क्लब ऑफ बॉम्बे हँगिंग गार्डन मुंबई च्या सौजन्याने नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर नुकतेच संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सहदेवरावजी भोपळे होते. शिबिरामध्ये नेत्ररोग तज्ञ डॉ थोरात यांनी 200 पेशंट ची तपासणी केली असून त्यापैकी 65 पेशंट मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले. गरजूंना अल्पदरात चष्मे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सरपंचा सौ शिल्पाताई मिलींद कुमार भोपळे , राजपालजी भोपळे , नलिनी ताई इंगळे , मुन्नाभाई मिरसाहेब , ऋषीकेश जी मोरे , डॉ कोरडे , श्याम भोपळे , मिलिंद कुमार भोपळे , रमेश दुतोंडे , सुनिल इंगळे , प्रकाश खोब्रागडे, सतिष राऊत, शांताराम कवळकार, लक्ष्मणराव हिवराळे, नसीम सौदागर, दिनकर राव भोपळे,डॉ धुळे,सुभाष इंगळे, अनिल भोपळे, सुशील इंगळे, मनिष इंगळे, जितेश कारिया,डॉ पोके, राजू खान, प्रकाशजी गावंडे,राजू भाई लोहावाले,संजय हिवराळे,विनोद ढबाले,तुलशिदास खीरोडकार बाळासाहेब नेरकर ऊमेश तिडके शफाभाई, अन्सार भाई, देवरावजी इंगळे, वासुदेव वाघ होते.डॉ थोरात यांचा सत्कार सुशील इंगळे यांनी तर ऋषिकेश मोरे यांचा सत्कार किरण सेदानी व गणेश इंगळे सर यांनी केला. या कार्यक्रमासाठी राजू लोखंडे,अभिजित कराळे, मंगेश मोरोकार, आकाश इंगळे, वैभव गोतरकार,रफिक सौदागर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन प्रा निखिल भड, प्रास्ताविक डॉ प्रशांत इंगळे तर आभार प्रदर्शन केशव कोरडे यांनीं केले.
अधिक वाचा : अष्टमीला प्रज्वलित केला ज्ञानयज्ञ अनाथ आरती-भारती शिक्षण प्रवाहात
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola