हिवरखेड (गणेश बुटे) : हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या काळेगाव येथील चोरी प्रकरणी तीन दिवसात पोलिसांनी आरोपीला अटक केली तसेच या प्रकरणातील चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड पो.स्टेशन अंतर्गत काळेगाव येथील भिमराव यशवंत वाहुरवाघ हे कुटुंबासह मुला कडे पुणे येथे 5 ते 6 महीन्या पुर्वी गेले होते. 11 आँक्टोबंर रोजी ते घरी आले असता त्यांचे घरातील टी.व्ही डी टी एच सेट व तांबे पितळ भांडी एकुण किमंत 7 हजार अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे आढळून आले या बाबत वाहुरवाघ यांनी हिवरखेड पो.स्टेशन ला फिर्याद दिली त्यावरुण भादवि.380 कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी ठानेदार सोमनाथ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे काँ.पांडुरंग राऊत व श्रीकृष्ण गायकवाड यांनी तपास करून तीन दिवसात आरोपी सुनील गोवर्धन गवई रा. काळेगाव याला अटक केली चोरीतील मुद्दे माल जप्त करण्यात आला.
अधिक वाचा : हिवरखेड ग्रामपंचायतीचे शॉपिंग कॉम्प्लेक्स चे बांधकाम अनधिकृत- मनसेचा आरोप
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola