सांगली : धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आता धनगर समाज आक्रमक झालाय. सांगलीत समाजाचे दोन मेळावे झालेत. या मेळाव्यात गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. त्यामुळे धनगर समाजाला अधिक बळ मिळणार आहे. राज्य सरकारने आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, हे आश्वासन अजून पूर्ण न झाल्याने धनगर समाज आक्रमक झालाय.सांगली जिल्ह्यात आरक्षणाच्या मागणीसाठी आयोजित केलेल्या धनगर समाजाच्या मेळाव्यात पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. जनता चुकीचे निर्णय घेते म्हणून गाढव निवडून येत असल्याचा जोरदार हल्ला त्यांनी चढवला. आरक्षणाची मागणी पूर्ण न केल्यास भाजप सरकार उलथून लावण्याचं आवाहन त्यांनी धनगर समाजाला केलं. सांगलीतल्या आरेवाडीच्या बनात धनगर मेळावा आयोजित करण्यात आला होता.
अधिक वाचा : चलो अयोध्या! उद्धव ठाकरे रचणार राम मंदिराची वीट!
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola