भारतीय परिवेशा मध्ये या संदर्भाला जोडून पाहीले तर जीथे उत्पादक,कष्टकरी,संपत्तीचा निर्माता असलेला शेतकरी आपल्या श्रम,बुद्धी,गुंतवणूकीचा मोबदला मिळवू दिला जात नाही म्हणून विपन्नावस्थेत जगतांना दिसत आहे.ज्या जगण्यामध्ये स्वातंत्र्य नाही,स्वाभिमान नाही,यश नाही,व्यवस्थेने समोर वाढून ठेवलेल्या अपयश अपमान,दारिद्र्याला कंटाळून लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या ,कुणाचे कपाळ कधी पांढरे होईल,कुणाच्या आयुष्याचा साथीदार कधी हिरावला जाईल काहीच शाश्वती नाही.अशा परिस्थितीत घरच्या लक्ष्मी च्या वाट्याला काय येत असेल? जीथे जगण्याची शाश्वती नाही तीथे सुखा, समाधानाचा प्रश्नच उदभवत नाही.
आजच्या दिवसाला मी १५ व्या वित्त आयोगाने समोर आणलेल्या राज्याच्या आर्थीक तथ्यांशीही जोडून बघतो.ज्यामध्ये विदर्भ,मराठवाड्यातील जनतेचे दरडोई उत्पन्न देशाच्या सरासरी दरडोई उत्पन्नाच्या तुलनेत प्रचंड कमी आहे.दरडोई उत्पन्नाचा सरळ संबंध माता भगिनींशी असतो कारण घर चालवण्याची कसरत त्याच निभावत असतात. जे दारिद्र्य दर्शवते,अस्वच्छता दर्शवते कारण स्वच्छतेतुन समृद्धी येत नसते तर समृध्दीतून स्वच्छतेकडे जाता येऊ शकते.लोक आपल्याला नेहमीच उलटी पट्टी पढवत राहतात.जीथे कुपोषण दिसते,अनारोग्य दिसते.शाळेच्या खिचडीच्या भरवश्यावर वाढणारी मुले दिसतात. कृषी व ग्रामीण क्षेत्रातील याच माय माऊल्या रण रागिणी दिवसाचे सोळा तास घाम गाळत असतात.त्यांच्या श्रमाचे मूल्य काय?
दोन वेळ पोटाला तुकडा व वर्षाचे दोन अंग झाकायला वस्त्र?
या लक्ष्मीच्या देण्यातून आम्ही कधी मुक्त होणार? यांच्या जगण्याचे,अस्तित्वाचे प्रश्न कधी समाजाच्या,जगाच्या कॅनव्हास वर येणार योग्य रीतीने येणार की नाहीत? या प्रश्नांना कधी आपण चिंतनाशी जोडणार की नाही?
या प्रश्नांची उत्तरे घेऊन युवाराष्ट्र चा पहीला दिवाळी अंक येतोय “लक्ष्मीमुक्ती” ची साद घेऊन!
कृषी व ग्रामीण क्षेत्रांत आयुष्याचे रण श्रमाने, घामाने,सोशिकतेने लढणाऱ्या आमच्या रणरागिणी माय बहिणींना या दिवाळी चा अंक समर्पित असणार आहे. दिवाळी अंकांची समृद्ध परंपरा असलेल्या महाराष्ट्रात अकोल्याचा मान उंचावणाऱ्या लक्ष्मीमुक्ती दिवाळी अंकासाठी युवाराष्ट्र सज्ज!
साहित्य हे सुध्दा एक प्रकारचे सृजनच असते! या सर्जकांच्या मुक्तीच्या,स्वातंत्र्याच्या चिंतनाशी जोडण्याचा प्रयास युवाराष्ट्र आपल्या पहिल्या वहिल्या लक्ष्मीमुक्ती या दिवाळी अंकातून करत आहे!अन्न,वस्त्र,निवाऱ्यानंतर आयुष्यात मानवाची सर्वात मोठी गरज किंवा तृष्णा असेल तर ती ज्ञानाची असते! असे ज्ञान जे व्यक्तीला व्यक्तित्वा पर्यंत व माणसाला माणुसकी पर्यंत घेऊन जाईल. युवाराष्ट्र च्या दिवाळी अंकात मानवी सभ्यतेच्या प्रगतीचा आढावा सांगणारे प्रागमानव शास्त्र असेल,प्रबोधनाचा आद्य वारसा सांगणाऱ्या लोकायत दर्शन वरचे चिंतन असेल! श्रीकृष्णाने शीकवलेला सांख्ययोग असेल! स्त्रिया,शेतकरी,संशोधक,साहित्यिक या सर्व सर्जकांच्या स्वातंत्र्याचे,मुक्ती चे ठोस चिंतनही असेल.युवाशक्तीला अस्तीत्व निर्माणासाठी नवा विचार देणारे चिंतन असेल! कथा असतील, कविता असतील,वऱ्हाडी प्रबोधनाचा धमाल विनोदी गोडवाही असेल!
कौटुंबीक जबाबदाऱ्या सांभाळत विविध क्षेत्रांत आपल्या कलागुणांचा,कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या नारीशक्तीचा थक्क करणारा प्रवास असेल! प्रबोधनाच्या आणी विचारांच्या बैठकीतून मानवी आयुष्यात परिवर्तनाचा महत प्रयास युवाराष्ट्र या अंकातून साकारत आहे.
महाराष्ट्रातील दिग्गज चिंतक आपले चिंतन या माध्यमातून सर्वांसाठी मांडणार आहेत!
राज्यभर युवाराष्ट्र च्या या वैचारिक व आयुष्यामध्ये,विचारसरणी मध्ये,दृष्टिकोना मध्ये सकारात्मक परिवर्तन आणण्याची क्षमता असलेल्या या दिवाळी च्या वैचारिक मेव्याची प्रतीक्षा राज्यभर अनेक सहृदयांना आहे!
आपण ही प्रबोधनाच्या या चळवळीला हातभार लावाल! आमच्या प्रयासांचे कौतुक कराल ही अपेक्षा नक्कीच आहे.
आपण अशा प्रकारे सहकार्य करू शकता- अनेक दिवस संग्रही राहणाऱ्या या सर्वांग सुंदर दिवाळी अंकाला आपल्या व्यवसायाची,संघटनेची ,वैयक्तीक जाहीरात देऊन प्रचाराचे एक सशक्त माध्यम युवाराष्ट्र या अंकाच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून देत आहे. 100/ रु किमतीच्या या अंकाची आगाऊ नोंदणी करून आपण सृजनाच्या या सेवेला हातभार लावण्या सोबतच वैचारिक ठेव्याचे वाटेकरी बनू शकता. आपल्या प्रियजनांना युवाराष्ट्र चा हा वैचारिक ठेवा भेट देऊ शकता!
दिवाळी नंतर ग्रामीण व कृषी क्षेत्रातील आमच्या माय, भगिनीं साठी व बालकांसाठी आरोग्य सेवा अभियान,कुपोषण निर्मूलन कार्यक्रम,रक्ताल्पता निर्मूलन कार्यक्रम ई कार्यक्रम व्यापकपणे युवाराष्ट्र राबवणार आहे.दिवाळी अंकाला आपले सहकार्य या खऱ्या लक्ष्मी असलेल्या माय, बहिणींच्या प्रश्नांना योग्य रीतीने समाजासमोर,माध्यमे व नेतृत्वासमोर आणण्यासोबतच,जनजागृती व या माता भगिनींच्या सेवेच्या उपक्रमांना ही मदत करणारे ठरणार आहे.तरी आपण युवाराष्ट्र च्या लक्ष्मीमुक्ती दिवाळी अंकाला जाहिरात किंवा 100 रु किंमतीच्या अंकाची नोंदणी करून सहकार्य करावे ही नम्र विनंती
जय युवाराष्ट्र! जय बळीराजा!!
जय मातृशक्ती!!!
डॉ निलेश पाटील
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola