दानापूर (सुनील धुरडे) : आपल्या घरातील किमान पेपरची रद्दी देऊन देखील आपण वंचित समाज घटकांसाठी काही तरी करू शकतो, याची जाणीव करून देण्यासाठी जागर फाउंडेशन अकोल्यात रद्दी संकलीत करीत आहे.
दिवाळी म्हणजे आनंदाचे पर्व. कुटुंबासाठी जमेल तितका खर्च करून हे आनंदाचे पर्व उत्साहात साजरा करण्याचा आपला प्रयत्न असतो. हि आपली नैसर्गिक गरज आहे. परंतू आपल्या आनंदात समाजाच्या वंचित घटकाचाही वाटा ठेवणं हि आपली नैतिक जबाबदारी आहे.
बस स्टँड, रेल्वे स्टेशन, मंदिर, देवस्थाने अशा सार्वजनिक ठिकाणी अनेक वृद्ध – अपंग लोकं, लहान लहान मुले जगण्याचा संघर्ष करतांना आपण पाहतो. कडाक्याच्या थंडीचा सामना करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे कपडे देखील नसतात. मग कोणती दिवाळी अन् कोणती ईद. दोन वेळेचं अन्न आणि अंगभर कपडे मिळाले तरी त्यांच्यासाठी आनंदाचा क्षण ठरतो. ऐन दिवाळीत भटकंती करणे लोक आपल्या मुलांना घेऊन रस्त्यावर, गावागावात भीक मागताना बघून सामान्य माणसाच्या मनाला सुया टोचतात. पण आपलाही संघर्ष काही कमी नाही त्यात या लोकांना आपण मदत कशी करू शकणार, असा विचार करून आपण तिथून काढता पाय घेतो.
इच्छा तिथे मार्ग
ज्यांना अशा लोकांना शक्य तितकी मदत करावीशी वाटते, अशा संवेदनशील लोकांकडून जागर फाउंडेशन पेपरची रद्दी संकलीत करीत आहे. हि रद्दी एकत्रित करून विकण्यात येईल. आणि त्यापैशांमधून वंचित समाज घटकांसाठी आवश्यक साहित्य वितरीत करण्यात येणार आहे.
संवेदनशील समाज बांधवांनी या उपक्रमात आपल्या घरातील पेपरची रद्दी देऊन सहभागी होण्याचे आवाहन जागर फाउंडेशनच्या वतीने करण्यात येत आहे.
रद्दी पेपर संकलनासाठी संपर्क
डॉ. आय. एस. हुसेन तेल्हारा – 9922257034
तुलसीदास खिरोडकार हिवरखेड – 9970276582
विदर्भ कंप्यूटर्स, राऊतवाडी अकोला – 9881953477
राहुल उमक कौलखेड, अकोला – 9766697665
अभिषेक उदावंत डाबकी रोड, अकोला – 9922646044
लोकसेवा मेडिकल्स निंबा – 8380094461
सुनील धुरडे दानापूर – 9604319204
महेश ताडे चोहोट्टा बाजार – 9822820103
– (नंदकिशोर चिपडे)
संयोजक
जागर फाउंडेशन, अकोला
अधिक वाचा : राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन स्वागताध्यक्षपदी अनिल गावंडे
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola