नवी दिल्ली : व्हॉट्सअॅप हे सध्या सर्वात मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे सोशल मीडिया माध्यम आहे. युजर्सच्या सोयीसाठी कंपनीकडून युजर्सना नवनवीन सुविधा देण्यात येतात. त्याचप्रमाणे कंपनीने काही दिवसांपूर्वी बहुप्रतिक्षित असे ‘डिलिट फॉर एव्हरिवन’ हे फीचर लाँच केले होते. त्यामुळे चुकून पाठवलेले मेसेज काही मिनिटांच्या आत युजर्सना डिलीट करण्याची सुविधा देण्यात आली होती. मात्र आता या फिचरमध्ये काहीसा बदल केल्याचे कंपनीने कळवले आहे. समोरच्याला पाठवलेला एखादा मेसेज तुम्ही डिलीट केलात आणि मेसेज पाठविलेल्या व्यक्तीचा फोन बंद असेल तर त्याला फोन सुरु केल्यावर तो मेसेज मिळणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे मेसेज डिलीट केल्याचे दिसले तरीही समोरच्या व्यक्तीला तो मेसेज मिळू शकणार आहे. आपल्याकडून चुकून एखादा मेसेज नको त्या व्यक्तीला गेल्यानंतर तो संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचण्यापूर्वीच डिलिट किंवा अनसेंड करता आला तर असा विचार अनेकांच्या मनात होता.
याबद्दल अनेकांनी व्हॉट्सअॅपजवळ अशाप्रकारच्या फीचरची मागणीही केली होती. सप्टेंबर महिन्यात या फीचरची चाचणी व्हॉट्सअॅपने केली होती आणि बऱ्याच प्रतिक्षेनंतर अखेर ते फीचर लाँचही करण्यात आले. अशाप्रकारे मेसेज रिकॉल करण्याचा कालावधी सुरुवातीला ७ मिनिटे आहे. समोरच्याला मेसेज डिलीट केल्याची रिक्वेस्ट १ तास ८ मिनिटे आणि १६ सेकंदात मिळणे आवश्यक आहे. पण आता ही रिक्वेस्ट मिळण्याचा कमाल कालावधी निश्चित करण्यात आला आहे. पण या फिचरचा होणारा गैरवापर लक्षात घेऊन कंपनीने ही नवीन सुविधा लाँच केली आहे. खूप आधी केलेला मेसेजही अनेकांकडून डिलीट केला जाऊ लागला.
असे होऊ नये म्हणून १३ तास ८ मिनिटे आणि ६० सेकंदात समोरच्याला तुम्ही मेसेज डिलीट केल्याचा संदेश न मिळाल्यास त्याला मेसेज डिलीट केला तरीही वाचता येणार आहे. हे फिचर पुढील आठवड्यात कार्यरत होईल असे बोलले जात आहे. सध्या ‘डिलिट फॉर एव्हरिवन’ हे फिचर अँड्रॉईड, आयफोन यांच्यासाठी उपलब्ध आहे. त्या सगळ्यांना या नवीन फिचरचा लाभ मिळणार आहे.
अधिक वाचा : ‘गुगल प्लस’ बंद होणार; फेसबुक पुढं फेल
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola