मूर्तीजापुर दि.१५ ( प्रकाश श्रीवास) : येथील युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल, डिझेल, गँस दरवाढीचा आगळा वेगळा निषेध व्यक्त करून” लाँलीपाँप” आंदोलन करण्यात आले.युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल, डिझेल, गँस दरवाढीचा निषेध व्यक्त करून निषेध पत्रक वाटुन शासनाच्या धोरणाचा नोंदविण्यात आला.दरवाढीच्या प्रचंड भडक्यामुळे सर्वसामान्य नागरीकांचे जगणे कठीण झाले आहे. मोदी सरकार अच्छे दीनाचे स्वप्न जनतेस दाखवून भूलथापा देत आहे. भाववाढीमुळे महीलांचे बजट कोलमडले आहे. निवडणूक काळात दिलेले आश्वासन हवेतच विरल्याने सरकारच्या निषेधार्थ मूर्तीजापुर विधानसभा युवक काँग्रेसच्या वतिने आनंद पेट्रोल पंपावर जावून” लाँलीपाँप आंदोलन करून निषेध पत्रकाचे ग्राहकांना वितरण करण्यात आले. युवक काँग्रेसचे शहाबुद्दीन यांच्या नेतृत्वाखालील या आगळया वेगळया लाँलीपाँप आंदोलनात काँग्रेस कमेटीचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब बाजड,शहर अध्यक्ष धिरज अग्रवाल,रोहित सोळंके, संभाजी डाबेराव, दिनेश लोहारकर,सलमान, दिवाकर इंगोले, अमोल तातुरकर,सुनील वानखडे, बाळासाहेब सरोदे, अशोक दुबे, आदी तालुका व शहर काँग्रेस कमेटीचे पदाधिकारी व युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा : हिरपूर (सांजापुर) येथील मालु गवई यांच्या गितास चित्रपटात स्थान
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola