तेल्हारा : श्री छत्रपती शंभूराजे प्रतिष्ठान चा यावर्षीचा संघर्ष पुरस्कार पत्रकार क्षेत्रात आपल्या लेखणीने एक वेगळी ओळख निर्माण करणारे जिल्हा पत्रकार संघाचे सहचिटणीस तथा तेल्हारा तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष सत्यशील प्रभाकरराव सावरकर यांना विशेष कार्यक्रमात देण्यात आला.
छत्रपती शंभूराजे प्रतिष्ठान च्या वतीने 2018 या वर्षा साठीचा संघर्ष पुरस्कार अण्णासाहेब आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्ष आ. नरेंद्र अण्णासाहेब पाटील, डाॅ. अभयदादा पाटील ,मराठा महासंघाचे विनायकराव पवार , हिदायत पटेल, संग्राम गावंडे, राजेश पाटील, कासोधाचे शेतकरी जागर प्रशांत गावंडे , रवि पाटील, अशोकराव नेमाडे , सप्तखजेरी वादक रामपाल महाराज व मान्यवरांच्या उपस्थितीत येथील माहेश्वरी भवनमध्ये युवक शेतकरी मेळावा प्रसंगी देण्यात आला. “संघर्ष पुरस्कार” 2018 ह्या साठी तेल्हारा तालुक्यातील पत्रकारी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून आपल्या क्षेत्रा बरोबरच सामान्य जनतेच्या समस्या, शेतकरी, शेतमजूर, कामगार वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यात आपली लेखणी झिजवून तालुक्यातील जलसंधारण प्रश्न,52 नदी नाले समस्या प्रखरतेने मांडणारे पत्रकार सत्यशील सावरकर यांना देण्यात आल्याने त्यांचे कौतुक केले जात आहे. या कार्यक्रमाचे आयोजन राजेश पाटील शंभूराजे प्रतिष्ठान यांनी केले होते.
अधिक वाचा : माजी नगरसेवक रामभाऊ फाटकर यांना पितृशोक
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola