अकोला (शब्बीर खान) : गत तीन वर्षांपासून राज्यभरातील व्यवसायिक व हौशी फोटोग्राफरच्या कलागुणाना अनेक स्पर्धा उपक्रमांच्या माध्यमाने वाव देणाNया अकोला-बुलडाणा जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनच्यावतीने व महापौर,अकोला मनपाद्वारे पुरस्कृत तीन दिवसीय राज्यस्तरीय फोटोग्राफी स्पर्धा व या स्पर्धेतील फोटोंच्या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले असून, या अनोख्या फोटो स्पर्धेत राज्यभरातील तब्बल दोनशे व्यावसायिक व हौशी फोटोग्राफरची विलक्षण फोटो कला अकोलेकर रसिकांना यावर्षीही बघावयास मिळणार असल्याची माहिती अकोला-बुलडाणा जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद मानकर, प्रकल्प प्रमुख जगदीश झुनझुनवाला, संजय आगाशे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी किशोर पिंपळे, मोहन सराग,कुष्णा चव्हाण,राहुल गोटे,गणेश मावळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
स्थानिक खंडेलवाल भवनात २६ ऑक्टोबर २८ ऑक्टोबर दरम्यान ही तीन दिवसीय राज्यस्तरीय फोटोग्राफी स्पर्धा व स्पर्धेतील फोटोंच्या प्रदर्शनीचे आयोजन होणार आहे.यात गत वर्षी घोषित केल्याप्रमाणे व्यावसायिक गटासाठी ‘जीवन एक संघर्ष’ हा विषय ठेवण्यात आला असून, या गटात १२ बाय १८ फोटोचा आकार असणे आवश्यक असून, यात उत्कृष्ट फोटोस प्रथम पुरस्कार १५ हजार रुपये राहणार असून, द्वितीय पुरस्कार १० हजार रुपये,तृतीय पुरस्कार ५ हजार रुपये तर तीन १५०० रुपयांचे उत्तेजनार्थ पुरस्कार ठेवण्यात आले आहेत.तसेच हौशी फोटोग्राफर्सकरिता ‘खेळ’ हा विषय ठेवण्यात आला आहे. कोणत्याही खेळ या विषयावर ८ बाय १२ आकाराचा फोटो या स्पर्धेत ग्राह्य राहणार असून, यात प्रथम पुरस्कार ५ हजार रुपये ठेवण्यात आला असून, द्वितीय पुरस्कार ३ हजार रुपये,तृतीय पुरस्कार २ हजार रुपये असून, यामध्येही तीन ५०० रुपयांचे उत्तेजनार्थ पुरस्कार ठेवण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या राज्यस्तरीय फोटोग्राफी स्पर्धा व प्रदर्शनीचे उद्घाटन खंडेलवाल भवनात २६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता मान्यवरांच्या हस्ते होणार असून, या आधी तज्ज्ञांच्या निरीक्षणात फोटोंचे परीक्षण होऊन निकाल घोषित करण्यात येणार आहे. स्पर्धेत व निरीक्षणात सहभागी असणारे फोटोच प्रदर्शनीत मांडण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पारितोषिक वितरण सोहळा हा २८ ऑक्टोबर रोजी समारोपीय दिनी सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.२२ ऑक्टोबरपर्यंत राज्यभरातील फोटोग्राफर्सनी आपले फोटो राज्यभरातील सुमारे २५ निर्धारित वेंâद्रांवर आणून द्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. सणासुदीच्या दिवसात अकोलेकर कलाप्रेमी नागरिक रसिकांसाठी २६ ते २८ ऑक्टोबरपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत आयोजित या निशुल्क फोटो प्रदर्शिनीचा रसिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन असासिएशनचे अध्यक्ष अरविंद मानकर, सचिव किशोर पिंपळे, कोषाध्यक्ष मोहन सराग, कृष्णा चव्हाण, राहुल गोटे, गणेश मावळे प्रकल्प प्रमुख जगदीश झुनझुनवाला, संजय आगाशे, किशोर काळे, हिम्मत कावरे, प्रमोद भटुरकर, सूचित देशमुख, गजानन अनपट, गणेश खेते, विनय टोले समवेत अकोला-बुलडाणा जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनच्या समस्त पदाधिकाऱ्यांनी यावेळी केले.
अधिक वाचा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अकोला जिल्हाध्यक्ष पदी पंकज साबळे
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola