अकोला – अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातंर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनेतंर्गत लाभार्थ्यांना रोजगारासाठी बँकांनी सुलभपणे कर्ज उपलब्ध करुन दयावे. लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारे अडचण भासू देऊ नये. कर्ज वाटपासाठी टाळाटाळ करणाऱ्या बँकासोबत महामंडळाने केलेला करार रदद करण्यात येईल, असे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सांगितले.
नियोजन भवनात आज अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातंर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले आदींसह बँकचे अधिकारी, लाभार्थी व मराठा समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातंर्गत सुशिक्षित बेरोजगारांसाठी स्वयंरोजगाराकरीता वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना आणि गट प्रकल्प कर्ज योजना राबविण्यात येतात, असे सांगून श्री. पाटील म्हणाले की, बेरोजगारांना स्वरोजगारासाठी सदर योजनेतंर्गत कर्ज मिळण्याकरीता बँकांनी लाभार्थ्यांना सहकार्य करावे. अडचणी असतील तर त्या सोडवाव्यात. दहा लाख रुपयांच्या कर्जाकरीता आयकर विवरण पत्र, जामीन व हमीपत्राची मागणी करु नये. तातडीने प्रकरणांचा निपटारा करावा. प्रकरणे प्रलंबित ठेवू नयेत. ज्या लाभार्थ्यांना अडचणी येतील त्यांनी जिल्हयाच्या समन्वयकांशी संपर्क साधावा. समन्वयकांनी लाभार्थ्यांच्या अडचणी सोडवाव्यात. सुशिक्षित बेरोजगारांसाठी लवकरच रोजगार मार्गदर्शन मेळाव्याचेही आयोजन करण्यात येईल.
जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय म्हणाले की, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातंर्गत असणाऱ्या योजनांमार्फत लाभार्थ्यांना सुलभपणे कर्ज मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने सहकार्य करण्यात येईल. बँकांनी प्राप्त प्रकरणांचा तातडीने निपटारा करावा. प्रकरणांचा तात्काळ निपटारा होण्यासाठी आणि लाभार्थ्यांच्या अडचणी सोडवण्याकरीता निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येईल. उदयोग सुरु करणाऱ्या लाभार्थ्यांना मोठया उदयोजकांचे मार्गदर्शन मिळण्याकरीता लवकरच एक ॲपही सुरुवात करण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित लाभार्थ्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या व त्यांच्या शंकांचे मान्यवरांनी निरसन केले.
अधिक वाचा : गाईंच्या संगोपनासाठी गाव तेथे गोशाळा उपक्रम राबविण्यात येणार -पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola