हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात स्वत:चा वेगळा ठसा उमटावणाऱ्या प्रख्यात सूरबहार वादक ‘पद्मभूषण’ अन्नपूर्णा देवी यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. त्या ९१ वर्षांच्या होत्या. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अन्नपूर्णा देवी यांच्या निधनामुळं गेल्या अनेक दशकांपासून एका साधनेनं सुरू असलेल्या सुरेल मैफलीतील ‘बहार’ गेल्याची भावना व्यक्त होत आहे.
वयोमानामुळं अन्नपूर्णा देवी थकल्या होत्या. त्यांना शारीरिक त्रासही जावणत होता. प्रकृती खालावल्यामुळं काही दिवसांपूर्वी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारांना यश आलं नाही. अखेर आज पहाटे चार वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
अन्नपूर्णा यांचा जन्म मध्य प्रदेशातील मैहर येथे १९२७मध्ये झाला होता. प्रसिद्ध संगीतकार अल्लाउद्दीन खान हे त्यांचे वडील होते. त्यांच्याकडूनच अन्नपूर्णा देवींनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सितार व सूरबहार वादनावर हुकूमत मिळवली. पुढं सूरबहार या वाद्याशी त्याचं नाव जोडलं गेलं. शास्त्रीय संगीतातील मैहर घराण्याच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा होता.
अधिक वाचा : गंगा नदीसाठी १११ दिवसांपासून उपोषण करणाऱ्या माजी प्राध्यापक जी.डी. अग्रवाल यांचे निधन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola