अकोट : आज अकोट शहरात शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.त्यामध्ये विशेषतः गाजी प्लॉट, आयेशा कॉलोनी,जलतारे प्लॉट या शहरातील मुस्लिम बहुल भागातून या अभियानाला लोकमागणीतून प्रारंभ झाला व जास्तीत जास्त मुस्लिम महिला व पुरुषांनी या अभियानात सदस्य नोंदणी करत आपला उस्फुर्त सहभाग नोंदवित शिवसेनेत प्रवेश घेतला.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे,शिवसेना ता.प्रमुख श्याम गावंडे,शहर प्रमुख सुनील रंधे,जितेश चंडालिया यांची लाभली.यावेळी उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना परिसरातील उपस्थित गोरगरीब लोकांना शासकीय योजनांची माहिती दिली.व त्या योजनांचा आपण कश्या प्रकारे लाभ घ्यावा याची संक्षिप्त माहिती दिली.शिवसेना ही सुरवातीपासूनच कष्टकरी,शेतकरी,मजूर व कामगारांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी बोलतांना सांगितले.शिवसेनेत ज्या लोकांनी प्राथमिक प्रवेश घेतला त्या लोकांचे सर्व उपस्थित मान्यवरांनी स्वागत केले.सर्व मान्यवरांनी एक निश्चय केला की येथून पुढे संपूर्ण अकोट तेल्हारा तालुक्यात ग्रामीण व शहरी भागात ताकदीने जोमाने सदस्य नोंदणी करण्यात येईन असे सांगितले.व जास्तीत जास्त लोकांनी शिवसेनेत सहभागी व्हावे असे आवाहन केले.यावेळी परिसरातील मौलाना हाफिज सैयद,मौलाना सलमान खान,वहिद भाई,तबजुल हुसैन,जफर हुसेन,श्रीकृष्ण तळोकर,शेख हकीम शेख शफीक,सलीम खां सत्तार खां, प्रणव चोरे,नासिर खां नियातउल्लाह खां,अब्दुल कदिर,साबीर खां सत्तार खां, राजीव उल्लाह खां,रशीद खां,श्याम इंगळे,हमीद खां अजहर खां,अब्दुल राजीक,प्रवीण कोमटकर,गजानन कोमटकर,अब्दुल राजीक,दीपक हापसे,आदिल खां सत्तार खां, सलमान खान,अफजल खां,शेख गुलाम शेख मुस्तफा,अब्दुल फारुख,सतीश ठाकरे,अन्सार खां, शेहनाज बी यांच्यासह शेकडो महिला व पुरुष उपस्थित होते.
अधिक वाचा : ऐन सनासुध्दीच्या तोंडावर महावितरणची लोडशेडींग, नागरीकांची गैरसोय
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola