मुख्य डोमेन सर्व्हरचे काही तासांसाठी नियमित देखरेखीचे काम सुरु असल्यामुळे इंटरनेट युझरना नेटवर्क फेल होण्याच्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
कारण मुख्य डोमेन सर्व्हर आणि त्याच्याशी संबंधित नेटवर्क इन्स्फ्रास्ट्रक्चर काही काळासाठी डाऊन असतील, असे रशिया टूडेच्या वृत्तात म्हटले आहे.
इंटरनेट कॉर्पोरेशन ऑफ असाईन्ड नेम्स अँड नंबर्स यादरम्यान क्रिप्टोग्राफिक की बदलून यावेळी मेंटनन्सचे काम करणार, यामुळे इंटरनेटचे अॅड्रेस बुक किंवा डोमेन नेम सिस्टम (DNS) संरक्षित करण्यात मदत होणार.
कम्युनिकेशन्स रेगुलेटरी ऑथॉरिटीने (CRA) काय म्हटले?
“सुरक्षा, स्थिर आणि लवचिक डीएनएससाठी ग्लोबल इंटरनेट शटडाऊन अतिशय गरजेचे आहे. युझरचे नेटवर्क ऑपरेटर किंवा इंटरनेट सर्विस प्रोव्हायडर (ISPs) या बदलासाठी तयार नसतील, तर काही अडचणी निर्माण होऊ शकतात. मात्र योग्य सिस्टम सिक्युरिटी एक्स्टेंशन्स एनेबल करुन याच्या प्रभावाकडे दुर्लक्ष करु शकतो.”
काय अडचणी येणार?
वेब पेज अॅक्सेस किंवा एखादा व्यवहार करण्यात अडचणी येण्याची शक्यता.
युझर आऊटडेटेड ISP चा वापर करत असतील तर ग्लोबल नेटवर्क अॅक्सेस करण्यात अडचणी येऊ शकते.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola