देशद्रोह आणि हत्येचा आरोप असलेले स्वयंघोषित गुरु रामपाल याला हिस्सार कोर्टाने दोन्ही गुन्ह्यात दोषी ठरवले आहे. आता त्याला काय शिक्षा सुनावली जाणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. दरम्यान हिस्सार कोर्टाच्या तीन किलोमीटर परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. सुनावणीच्या दरम्यान २० हजार समर्थक कोर्ट परिसर, तुरूंग, टाऊन पार्क आणि रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये येण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. समर्थकांनी हिसंक वळण घेऊ नये त्यासाठी प्रशासनाने आधीच सर्व उपाययोजना केली.
१९५१मध्ये सोनपत येथील एका शेतकरी कुटुंबात जन्मलेला रामपाल हरयाणा सरकारच्या पाटबंधारे खात्यात कनिष्ठ अभियंता होता. सेवेतील कुचराईवरून त्याला काढले गेल्याचे बोलले जाते, १८ वर्षांच्या सेवेनंतर ते स्वत:हून निवृत्त झाले, असे त्यांचे समर्थक सांगतात. सेवेत असतानाच १९९९मध्ये त्याने आपला पहिला आश्रम काढला. नंतर आपण संत कबीरांचा अवतार आहोत, असे त्याने जाहीर केले व हरयाणात अनेक भागांत आश्रम काढले. २००६ पासून देशद्रोह आणि हत्येचा खटला सुरु झाला. त्यानंतर चर्चेत आला. हत्येप्रकरणी २०१४ मध्ये स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू रामपालला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या.
अधिक वाचा : पी. चिदंबरम यांचे पूत्र कार्ती चिदंबरमची भारत, ब्रिटन, स्पेनमधील ५४ कोटींची संपत्ती जप्त
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola