नाशिक – संसारामध्ये सतत उडणार्या खटक्यांना कंटाळून पत्नी जिवंत असताना १०० पतींनी त्यांचे श्राद्ध घातल्याची घटना नाशिकमध्ये घडली. समाजातील या अनोख्या प्रकाराची सर्वत्र चर्चा रंगली आहे. विवाहित पुरुषांवर पत्नीकडून होणार्या अत्याचाराविरोधात काम करणार्या वास्तव फाऊंडेशनच्या पुढाकाराने हा श्राद्ध विधी पूर्ण करण्यात आला.
विवाहित पुरुषांच्या हक्कासाठी ४ वर्षांपूर्वी वास्तव फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली. याच फाऊंडेशनच्या माध्यमातून राज्यभरातील पीडित पुरुषांनी गोदावरी नदीतील रामकुंड परिसरात चक्क जिवंतपणी पत्नीचे श्राद्ध घातले.
अग्निदेवाला साक्षी मानत वेदमंत्रांच्या उच्चारात हा विधी पार पडला. विवाहित पुरुषांना घरात होणार्या अत्याचारापासून मुक्ती मिळावी, समाजाला पुरुषांवर होणार्या कौटुंबीक छळाची जाणीव व्हावी, सुखशांती मिळावी, अशी मनोकामना यावेळी पुरुषांनी केली. अनोखा श्राद्ध विधी बघण्यासाठी गोदाघाट परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती.
अधिक वाचा : रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस जाहीर!
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola