अकोट (प्रतिनिधी) : अकोट येथील सिंधु सहकारी पतसंस्था खातेदारांना ५ लाखाने फसविणारा फरार आरोपी गजाआड करण्यात अकोट शहर पोलिसांना अखेर यश आले. अकोट शहर पोलिस स्टेशन येथे फिर्यादी नामे विलास हरिभाऊ कावरे (वय ४५ वर्ष) व्यवसाय नोकरी (शाखा प्रबंधक ) भारतीय सिंधू सहकारी पतसंस्था मर्यादित अकोला शाखा अकोट यांनी दिलेल्या लेखी तक्रारीनुसार, अकोट येथे राहणारया नीलिमा दिलीप मोरे या सन २००२ पासून त्यांच्या शाखेमध्ये आर. डी. एजंट म्हणून काम करीत होत्या. संस्थेमधील खातेदारांकडून नियमित पैसे घेऊन बँकेत भरण्याचे काम करीत असतांना त्यांनी त्यांचा मुलगा नामे मोहन उर्फ मोनू वानखडे याची ओळख खातेदारांना करवून दिली व आता माझा मुलगा आपल्याकडून पैसे घेऊन बँकेत भरणार असल्याबाबत सर्व खातेदारांना सांगितले. परंतु मोहन उर्फ मोनू वानखडे याने खातेदारांकडून नियमित पैसे वसूल करून सदर पैसे बँकेत न भरता स्वतःकडे ठेवले. त्याबाबत पासबुक वर सुद्धा एन्ट्री केल्या. सदर प्रकरणामध्ये आरोपी नीलिमा मोरे व त्यांचा मुलगा मोहन वानखडे यांनी संगनमत करून खातेदारांकडून पैसे घेऊन त्याबाबत बँकेत कुठलीही एन्ट्री न करता अपहार केला आहे. याची सखोल चौकशी करून आरोपींवर गुन्हा दाखल करावा, असे नमूद करण्यात आले होते. या तक्रारीवरून सखोल चौकशी करून अपहार केल्याचे सिद्ध झाल्याने दोन्ही आरोपींंवर २२/०६/२०१८ रोजी अप. नं.२२३/१८ कलम ४०९,४२०भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्यातील दोन्ही आरोपी हे अकोट येथील राहणारे असून, त्यांच्यावर गुुन्हा दाखल झाल्यापासून ते फरार होते.
यांचा पोलीस स्टेशन परिसरात तसेच त्यांचे नातेवाईकांकडे शोध घेतला परंतु ते मिळून आले नव्हते. करून त्यांचा ठावठिकाणा पुणे जिल्ह्यातील पोलीस स्टेशन शिरुर परिसरात असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याठिकाणी जाऊन स्थानिक पोलिसांची मदत घेऊन आरोपींचा शोध घेतला असता यातील आरोपी मोहन उर्फ मोनू हा मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन अकोट शहर येथे परत येऊन रीतसर अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन सोनटक्के, उदय प्रसाद शुक्ला व महिला पोलीस कॉन्स्टेबल उमा बूटे यांनी केली. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे करीत आहेत.आरोपीला अकोट न्यायालयाने ११ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अधिक वाचा : अकोट सा.बा. उपविभागाच्या अधिकारी यांच्या खाली खुर्चीला बेशरम फुलाच्या गुच्छाची भेट
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola