नागपूर : ब्राह्मोस हेरगिरीप्रकरणी निशांत अग्रवाल ला नागपूर सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने अग्रवालला तीन दिवसांचा ट्रांझिट रिमांड दिला आहे. तीन दिवसांच्या आत त्याला लखनौच्या एटीएस न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान, याप्रकरणी आणखी दोन जणांना उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आली आहे.
येथील ब्राह्मोस युनिटमध्ये काम करणाऱ्या निशांत अग्रवालला उत्तर प्रदेश एटीसने काल (सोमवार) अटक केली होती. अटक करण्यात आलेल्या अग्रवालवर गोपनीय दस्तऐवज लीक केल्याचा आरोप आहे. काल उत्तरप्रदेश पोलिसांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन कारवाईची माहिती दिली.
या सर्व प्रकरणात प्रचंड गोपनीयता बाळगली जात आहे. गोपनीय दस्तऐवज पाकिस्तान आणि अमेरिका एजंटला लीक केल्याप्रकरणी अटक झाल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्याकडून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे
वर्धा रोडवरील उज्वल नगर येथे मनोहर काळे यांच्या घरी निशांत अग्रवाल भाड्याने राहत होता. १५ ते २० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली. रविवारी रात्रीच हे पथक नागपुरात दाखल झाले होते.
अधिक वाचा : ब्रेकींग: ब्रह्मोस अॅरोस्पेस नागपूर युनिटमध्ये काम करणाऱ्या ISI एजंटलाअटक
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola