भिलाई : छत्तिसगडमधील भिलाई स्टील प्लान्ट (बीएसपी) येथे मंगळवारी गॅस पाइपलाइनचा स्फोट झाला. या दुर्घटनेत आठ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. इतर 12 जण भाजले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी 4 जणांची प्रकृती अजुनही चिंताजनक आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहेत.
रिपेअरिंग करताना घडली दुर्घटना
ही घटना मंगळवारी सकाळी 11 वाजता घडली आहे. कारखान्यात रिपेअरिंगचे काम सुरू होते. त्याच दरम्यान पाइपलाइनची वेल्डिंग सुरू असताना पाइप फाटले आणि मोठा स्फोट झाला. अवघ्या काही सेकंदात आगीने रौद्र रूप धारण केले. घटनास्थळी दाखल झालेल्या बचाव पथकाने दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना घडली त्यावेळी 24 जण काम करत होते. त्यापैकी 8 जणांचा मृत्यू झाला. 12 जण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहेत. तर उर्वरीत 4 जणांचा अजुनही पत्ता लागलेला नाही. भिलाई पोलाद कारखान्यात जून 2014 मध्ये विषारी वायूची गळती झाली होती. त्या घटनेत सुद्धा दोन उप-व्यवस्थापकांसह 6 जणांचा मृत्यू आणि 40 जण जखमी झाल्याची नोंद आहे.
अधिक वाचा : तेल्हारा आगरच्या चालत्या बसचे टायर अचानक फाटले,अनर्थ टळला
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola