मुंबई : महाराष्ट्र सरकारने हुक्का पार्लरवर बंदी लागू केली आहे. तसेच याबाबतची अधिसूचना सुद्धा राज्याच्या गृहविभागाने जारी केली आहे. सिगरेट आणि तंबाखू उत्पादनसंबंधी अधिनियम २००३ कायद्याचे उल्लंघन केल्यास एक लाख रुपये दंड आणि ३ वर्षांच्या शिक्षेची तरतूद यामध्ये करण्यात आली आहे.
हुक्का पार्लर बंदी लागू करणारं गुजरात नंतरच महाराष्ट्र हे दुसरं राज्य आहे. डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या नागपूर अधिवेशनात भाजपचे मुंबईतील आमदार मंगलप्रभात लोढा यांनी विधीमंडळात हुक्का पार्लर बंदी विधेयकाचा प्रस्ताव मांडला होता. दरम्यान, यावर्षी म्हणजे एप्रिलमध्ये २०१८ मध्ये हे विधेयक विधीमंडळात पारित करण्यात आलं. अखेर राष्ट्रपतींनी मंजुरी दिल्यानंतर महाराष्ट्र सरकारने ही अधिसूचना जारी केली आहे.
यापूर्वीच्या घटनांचा आढावा घेतल्यास लोअर परळ येथे कमला मिलमध्ये डिसेंबर २०१७ मध्ये हे अग्नितांडव झालं होत, त्यात हुक्का पार्लरमुळे आग लागून १४ लोकांचा बळी गेला होता. त्यानंतर खडबडून जाग आलेल्या महाराष्ट्र सरकारने ही बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला होता.
अधिक वाचा : अवैध धंद्याविरोधात कडक कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola