नागपूर- ब्रह्मोस अॅरोस्पेस युनिटमध्ये काम करणाऱ्या आयएसआय एजंटला नागपुरातून अटक केली आहे. महाराष्ट्र व उत्तर प्रदेश दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) संयुक्त्यपणे दी ८ ऑक्टोबर सोमवार ला ही कारवाई केली. एका संशयिताला एटीएसच्या अधिकार्यांनी ताब्यात घेतले आहे.
निशांत अग्रवाल असं या संशयिताचं नाव असून लष्करातील गोपनीय माहिती, तसेच ब्राह्मोस क्षेपणास्त्राची माहिती लीक केल्याचा संशय असल्याचं सांगण्यात येत आहे.
ब्राह्मोस युनिटवर काम करताना देशाच्या सुरक्षेच्या संदर्भातील अत्यंत गोपनीय अशी माहिती निशांत अग्रवालकडून लीक करण्यात आल्याचा एटीएसला संशय आहे. ही माहिती कुणाला दिली किंवा तसा प्रयत्न होता, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र चौकशी दरम्यान सर्व खुलासा होईल असा विश्वास एटीएसला आहे.