तापडिया नगर येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगण ,सौंदर्यीकरणाच्या कामाचे भूमिपूजन संपन्न
अकोला, दि. 07—अकोला शहरात अनेक विकास कामे सुरु आहेत, या सर्व कामांसह शहराच्या सर्वांगिण विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. जेष्ठ नागरिक, महिला, मुले यांच्याकरीता शहरातील खुल्या भूखंडांचे सुशोभिकरणाची कामे सुरु आहेत. या माध्यमातून खुल्या भूखंडाचा कायाकल्प केला जाईल, अशी ग्वाही देत अकोल्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द आहे, असे प्रतिपादन गृहराज्य मंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले.
तापडिया नगर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगणाचे सौंदर्यीकरण करण्याकरीता पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी त्यांच्या विकास निधीतून रु. 97 लक्ष मंजूर केले आहेत. या कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते आज सकाळी झाले. त्यावेळी सदर क्रिडांगणावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी आमदार गोपीकिशन बाजोरिया, नगरसेवक सर्वश्री हरिष अलीमचंदाणी, गिरीश गोखले, अशिष पवित्रकार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिथिलेश चव्हाण, माजी आमदार वसंतराव खोटरे, डॉ. अशोक ओळंबे, माजी जि.प. अध्यक्ष दादासाहेब मते, माजी नगरसेवक गोपीभाऊ ठाकरे, डॉ. आर.एन. भांबुरकर, डॉ. अनिरुध्द भांबुरकर, डॉ. प्रशांत वायाचाळ, दीपक मायी, आरती लडडा, डॉ. पुरुषोत्तम तायडे, अकोला अर्बन बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब पाठक, पालकमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी उज्वल चोरे, स्वीय सहायक प्रवीण साखरे, शरद झामरे आदी मान्यवर उपस्थित होते.
मागील चार वर्षांत अकोल्याच्या विकासाचा बॅकलोग भरुन काढण्यात येत आहे, यासाठी शहरात अनेक विकास कामे सुरु आहेत, असे सांगून पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील म्हणाले की, एक सामाजिक जबाबदारी म्हणून शहरातील खुले भूखंड सुशोभित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगणाशी माझे लहानपणापासून नाते आहे, या क्रिडांगणाचे सुशोभिकरण करीत असताना जेष्ठांपासून ते मुलांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त असे हे क्रिडांगण केले जाईल. या ठिकाणी एलईडी लाईट लावण्यात येतील. चोहोबाजुनी कपाऊंड बांधले जाईल. तसेच मुख्य प्रवेशव्दारही बांधले जाईल. ओपन जिम, लहान मुलांच्या संस्कारासाठी एक दालन, जेष्ठ नागरिकांसाठी नाना-नानी पार्क या सुविधेसह खेळाडुंसाठी सुसज्ज असे मैदान केले जाईल.
दरम्यान, शहरात सध्या सांस्कृतिक घडामोडींसाठी भव्य सांस्कृतिक भवन बांधण्याचे काम सुरु आहे, याच परिसरात एक खेळाचे कॉम्पलेक्स, महाजलतरण तलाव, खेळाचे मैदानही विकसित केले जाणार आहे, त्यासाठी 30 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला जाईल. नुकताच शहरात झालेल्या भव्य रोजगार मेळाव्याला सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. दीड हजार पेक्षा जास्त उमेदवारांना या मेळाव्यातून नोकरीची संधी मिळाली. अकोल्याच्या रोजगार मेळाव्याचा हा पॅटर्न आता राज्यभर राबविला जाणार आहे, असेही यावेळी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सांगितले.
यावेळी आमदार गोपीकिशन बाजोरिया, नगरसेवक गिरीष गोखले, डॉ. अशोक ओळंबे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी मंत्री स्व. वसंतराव धोत्रे, सामाजिक कार्यकर्ते स्व. राजाभाऊ देशमुख यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर भूमिपूजन व फलकाचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय मिश्रा यांनी केले , तर आभार ॲड अनुप देशमख यांनी मानले.
यावेळी तापडियानगर सेवा समितीचे अध्यक्ष अमित देशमुख, उपाध्यक्ष उमेश ठाकरे, सचिव प्रशांत जाधव, सहसचिव सुनील देशमुख, कोषाध्यक्ष सुनिल राजंदेकर, सदस्य गजानन देशमुख, विजय शिंदे, परिमल लहाने, शैलेंद्र पाटील, अजय चांदुरकर, मुकुंद देशमुख, गौरव जाधव, रमेश अग्रवाल, अविनाश जोशी, नाना देशमुख, श्री. काकड, चांदुरकर, नंदु देशमुख, नंदु चेडे, सुधाकर देशमुख, सोनु देशमख, प्रताप देशमुख, हर्षवर्धन देशमुख यासह परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola