अकोट शिवसेनेतर्फे महावितरनाला शेतकरी हितासाठी निवेदन
अकोट(प्रतिनिधी)- थकीत वीज बिलाची रक्कम अदा केल्याशिवाय नादुरुस्त रोहित्राच्या जागेवर नवीन रोहित्र बसवू नये असा आदेश महावीतरणाने परीपत्रक काढले आहे.या आदेशानमुळे शेतकऱ्यांसमोर महासंकट निर्माण झाले आहे.हा आदेश त्वरित रद्द करण्यात यावा.एकीकडे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या हिताच्या फक्त जाहिराती व एकीकडे शेतकरी विरुद्ध औरंगजेबी निर्णय.शेतकऱ्यांना दिवसाची लाईट देणेबाबत व वेळ ८ तासाऐवजी १२ तास करणेबाबत,गेली बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव हा वीज वेळेवर तसेच मुबलक मिळत नसल्याने अडचणीत सापडला आहे.महावितरण शेतकऱ्यांना विजेचा पुरवठा हा रात्री बेरात्री करीत असून त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसभर शेतात काम करून रात्री कितीही वाजता शेतात जाऊन पाण्याची व्यवस्था करण्यासाठी रात्रभर जागी राहावे लागते.शेतकरी हा दिवसभर शेतात राब राब राबतो त्याच्या जीवाला थोडा सुद्धा आराम मिळत नाही.आता थंडी सुरू झाली असून रात्री तापमान ८ ते १० डिग्री सेल्सियस असते.रात्री लाईट देणेबाबत ज्याने हा निर्णय घेतला असेल तो शेतकऱ्यांचा वैरी असावा असा सूर सूर शेतकऱ्यांमधून उमटत आहे.शेतातील विज रात्रीबेरात्री येत असल्याने वीज डी.पी.वरील फ्यूज गेला तर तो टाकण्यासाठी मंडळाने रात्रीचे कर्मचारी दिलेले नसल्यामुळे शेतकऱ्यांना स्वतःचा जीव धोक्यात टाकून फ्यूज टाकावे लागतात.शेतकऱ्यांना रात्रीचे वेळी अनेक अडचणी येतात त्यामध्ये प्रामुख्याने विजेचा शॉक,जंगली जनावरे त्यात रानडुक्करे,साप,विंचू पासून शेतकऱ्यांना धोका आहे.जर यामधून कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली तर याची संपूर्ण जबाबदारी महावितरण घेईल का ? हा प्रश्न निर्माण झाला आहे.तरी आमच्या या मागण्यांकडे विद्युत महावितरनाने गांभीर्याने लक्ष द्यावे.अन्यथा शिवसेनेतर्फे भव्य आंदोलन छेडल्या जाईल.अशा आशयाचे निवेदन आज शिवसेनेतर्फे देण्यात आले.यावर महावितरण कार्यकारी अभियंता पी.पी.काकडे यांनी तत्काळ या मागणीचा प्रस्ताव म.रा. वि.वि.कंपनी मर्या.मंडळ अकोला या कार्यालयाला पाठवला असे लेखी उत्तर त्यांनी दिले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे,युवासेना उपजिल्हाधिकारी राहुल कराळे,ता.प्रमुख श्याम गावंडे,शहर प्रमुख सुनील रंधे,आदिवासी ता.प्रमुख सुभाष सुरत्ने,जितेश चंडालिया,गोपाल कावरे,राहुल पाचडे,योगेश सुरत्ने,प्रशांत येऊल,श्रीकांत कांबे,उमेश आवारे,,बच्चू भगत,ऋषिकेश लोणकर,नामदेवराव केने,अमोल सोनोने,भास्कर कोळसकर,डॉ.वरणकार,अनुप वरणकार, निखिल महल्ले,नंदकिशोर बोन्द्रे, राम वरणकार,प्रवीण खवले, सोपान सोनोने,अजय नांदूरकर, प्रफुल बोरकुटे इ.शिवसैनिक उपस्थित होते.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola