तेल्हारा(प्रतिनिधी)- आज रोज प्रमाणे सायंकाळी ठाणेदार विकास देवरे हे पेट्रोलिंग साठी निघाले असता संत तुकाराम चौकात वाहतुकीस अडथडा निर्माण करणाऱ्या वाहनांवर कारवाई करीत असताना दोन युवक हे हुल्लरपणा करीत असल्याने आणि तेही त्याच्यासमोर हुलरपणा करीत असल्याने त्यांना चांगलाच चोप भर चौकात ठाणेदार यांनी दिला.
तेल्हारा पोलिस स्टेशनचे ठाणेदार विकास देवरे यांनी पदभार सांभाळल्यापासून तेल्हारा शहरात शांतता राखण्याचे काम करीत असून ते गेल्या काही दिवसांपासून क्विक ऍक्शन घेऊन टपोरीगिरी करणारे तसेच विनयभंग प्रकरणात त्वरित कारवाई करीत असल्याने शहरातील नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.त्यांच्या दबंगगिरीचा त्यांनी गेल्या काही प्रकरणात परिचय दिल्याने काही टवाळखोर युवक लाईनवर आले आहेत.ठाणेदार विकास देवरे यांच्या अशा कारवाईमुळे नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola