तेल्हारा (प्रतिनिधी ): तालुक्यातील चांगलवाडी येथील अंतर्गत मुख्य रस्त्यांची झालेली दुरावस्था व त्यापासुन ग्रामस्थांना होणारा त्रास याबाबत अवर अकोला न्युज ने कालच सचित्र अशी बातमी प्रकाशित केली होती याची दखल कुठल्याच प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनि घेतली नाही मात्र लोकजागर मंचने याची दखल त्वरित घेऊन स्वखर्चाने गावतील सांडपान्याची विल्हेवाट करीत अंतर्गत रस्ता दुरुस्तीला सुरवात केली आहे.
आधीची बातमी : चांगलवाडी येथील मुख्य रस्त्याची ग्रा.पं.प्रशासनाच्या आशीर्वादाने ऐशीतेशी
तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत येणार्या चांगलवाडी येथे अंतर्गत मुख्य रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे . गावातील सांडपाण्याचे व्यवस्थापन नसल्याने सदर सांडपाणी हे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेलगतच्या स्त्यावर वाहते त्यामुळे येथील विद्यार्थ्यासह ग्रामस्थांना चालणे कठीण झाले होते . सदर वाहणारया सांडपाण्यामुळे गावालगतच असणारा शेतरसत्याला गटारगंगेचे स्वरुप प्राप्त झाले होते. या रस्त्यावरुन जातानां शेतकर्याना समस्या येत होत्या. काही दिवसापूर्वी या रस्त्यावरील गटारात अडकून येथीलच एका शेतकर्याचा बैल अडकून गंभीर जख्मी झाला होता . गावातील सांडपाणी व्यवस्थापन करुन रस्ते दुरुस्त करणे बाबत येथील नागरिकांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती , जिल्हा परिषद सदस्य,अकोटचे आमदार यांचेकडे वारंवार विनंती करुन देखील काहिच उपयोग झाला नाही . अवर अकोला न्युज ने कालच याबाबत बातमी प्रकाशित केली होती. याची दखल घेत लोकजागर मंचचे संस्थापक अध्यक्ष अनिल गावंडे यांच्या या गावात भेटी दरम्यान सदर बाब ग्रामस्थांनी सुद्धा लक्षात आणुन दिलि व रस्ता दुरुस्ती ची विनंती केली असता त्यांनी त्वरित स्वखर्चाने रस्ता दुरुस्ती करुन देण्याचे मान्य केले . व दुसर्याच दिवशी रस्ता दुरुस्ती ला प्रत्यक्ष सुरुवात करुन दिली . रस्ता दुरुस्तीला सुरुवात होताच ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले व सदर रस्त्यासाठी आणखी गरज भासल्यास लोकवर्गणी गोळा करण्याचा निर्धार केला.
गावातील सांडपाण्याचं व्यवस्थापन नसल्याने हे सांडपाणी माझ्या शेताकडे जाणार्या शेतरस्त्यावर येत असल्याने शेतरस्ता अतिशय खराब झाला होता .सदर रस्त्यावर फसल्याने माझा बैल गंभीर जख्मी होवुन माझे नुकसान झाले होते लोकजागर मंचने पुढाकार घेत या रस्त्याची दुरुस्ती सुरु केल्याने रस्त्यावीषयीच्या समस्येपासून सुटका होत आहे.