पातूर(शब्बीर खान) : पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कापशी गावाजवळून दीपक पवार नामक युवकाचे अपहरण झाल्याच्या तक्रारीवरून, गुरुवारी पातूर पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पातूर पोलिसांनी अपहरण झालेला युवक आणि अपहरणकर्ता या दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली असून, या अपहरणनाट्याच्या मागचे रहस्य काय? याचा लवकरच उलगडा होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोला शहरातील जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीतील गंगानगर २ मधील रहिवाशी दीपक पवार नामक युवकाचे कापशी जवळून अकोल्यातील रहिवासी असलेल्या मोहसीन नामक इसमाने अपहरण केल्याची तक्रार दीपक पवार यांची पत्नी आशा दीपक पवार यांनी पातूर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. याप्रकरणी पातूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. ज्या दीपक पवाराचे अपहरण झाले होते, त्याला आणि ज्याच्यावर अपहरण करण्याचा आरोप करण्यात आला, अशा दोघांनाही पातूरचे ठाणेदार आणि त्यांच्या चमूने गुरुवारी सकाळी ११ वाजता जिल्हा सत्र न्यायालयाच्या जवळील एका चहाच्या हॉटेल जवळून ताब्यात घेतले आहे. दीपकसोबत अटक केलेल्या आरोपीचे नाव शेख मोहसील शेख समद, रा. न्यू तापडिया नगर, अकोला असे असून, या प्रकरणात अजून ४ ते ५ आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, दीपक पवारचे खरोखरच अपहरण झाले होते का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
अधिक वाचा : माहेरवरुन पैसे आणण्यास नकार देणाऱ्या पत्नीला जाळले
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola