अकोला(प्रतिनिधी)- दि.४ ऑक्टो रोजी सिव्हिल लाईन पो. स्टे. सीमेतील स्थानिक “सीताबाई कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय” येथे “विद्यार्थी व सायबर सुरक्षा” या विषयावर SWAS टीमची कार्यशाळा संपन्न झाली. सध्याच युग हे माहिती तंत्रज्ञानाच युग आहे. सिटीझन हे नेटिझन झाले आहेत त्यामुळे तरुण मुलं-मुली कळत नकळत सायबर गुन्ह्याकडे वळत आहेत. अज्ञानामुळे व अद्ययावत माहिती नसल्यामुळे सायबर बळींची संख्या दिवसेगाणिक वाढत चालली आहे. सोशल नेटवर्किंगचा वापर करत असतांना त्यातील Do’s आणि don’ts माहीती करून घेतल्यास बऱ्याच अंशी सायबर गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होईल.
कार्यशाळेमध्ये उपस्थितांना पो.कॉ.विशाल मोरे ह्यांनी अकोला पोलिसांनी सुरक्षे संदर्भातील तयार केलेल्या विडिओ क्लिप्स दाखवून छेडखाणी प्रतिबंध उपाययोजना, महिलांविषयक कायदे, सायबर क्राईम, ट्राफिक नियम, चारित्र्य पडताळणी चे महत्व, Ikola अँप, महत्वाची हेल्पलाईन क्रमांक इत्यादी बाबत मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या प्रश्न समस्यांचे निराकरण केले. SWAS सदस्या डॉ. स्वप्ना लांडे ह्यांनी जादूटोणा विरोधी अधिनियमातील बारकावे प्रात्यक्षिकासह स्पष्ट करून दाखविले.
कार्यशाळेला विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग आजच्या कार्यशाळेच्या आयोजिका तसेच SWAS टीम सदस्या प्रा. शेमबेकर मॅडम, कु.पायल तायडे, कु. निधी टोपरे, कु.वैष्णवी निकोरे व पो. कॉ. गोपाल मुकुंदे ह्यांची उपस्थिती होती.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola