अकोला – जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या संकल्पनेतून लोकसहभागातून राबविण्यात आलेले देशातील सर्वात मोठे मोर्णा नदी स्वच्छता अभियानावर जिल्हा माहिती कार्यालयाचे कॅमेरामन यांनी दिग्दर्शित केलेल्या मोर्णा स्वगत माहितीपटाचे लोकार्पण आज राज्याचे वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.
शिवणी विमानतळावर छोटेखानी कार्यक्रमात सदर कार्यक्रम पार पडला. यावेळी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील, महापौर विजय अग्रवाल, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर हे उपस्थित होते. याच कार्यक्रमात डॉ. राजेश देशमुख यांनी दिग्दर्शित केलेल्या हेल्मेट आणि मोर्णा नदी माहितीपटाचेही मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.
लोकचळवळ असणारे मोर्णा अभियान अकोलेकरांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. अकोल्याची जीवनवाहिनी असणारी मोर्णा जलकुंभीमुळे मृतावस्थेत गेली होती, तिला स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून पुनर्जीवित करण्याचे कार्य जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, नागरिक, सेवाभावी संस्थानी पूर्ण केले. या स्वच्छता अभियानाची दखल देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमामधून घेतले.
मोर्णा स्वगत पूर्णत्वास येण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे उपसंचालक राधाकृष्ण मुळी, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांचे मार्गदर्शन लाभले असून निर्मिती सहाय्य तहसीलदार राहुल तायडे यांचे असून स्वगत लेखन/संगीत संकल्पना रवी धोंगळे व स्वगतचे निवेदन श्रद्धा वरणकार यांनी केले आहे. प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे, सहायक माहिती अधिकारी नितीन कुमार डोंगरे, संतोष अग्रवाल यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. मोर्णा अभियानाचे कार्य दृकश्राव्य माध्यमातून स्वगत रूपाने लोकांपुढे येत असून मोर्णा स्वगतचे दिग्दर्शक चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्वांचे कौतुक होत आहे.
अधिक वाचा : अकोला भा.ज.पा.महीला आघाडी राबवणार मतदार नोंदणी अभियान
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola