मुंबई : चंदा कोचर यांनी ICICI Bank च्या सर्व पदांचा राजीनामा दिलाय. कोचर या बँकेच्या कार्यकारी संचालक आणि सीईओ होत्या. व्हिडीओकॉन कंपनीला दिलेल्या कर्जाचं प्रकरण त्यांना भोवलं आहे. हे कर्ज देताना कोचर यांनी व्यक्तिगत हित बघितलं आणि त्याचा फायदा घेतला असा त्यांच्यावर आरोप होता. जून महिन्यापासून त्या सक्तीच्या रजेवर होत्या. बँकेच्या संचालक मंडळाचा आणि शेअर धारकांचा दबाव असल्याने शेवटी त्यांनी संचालक मंडळाकडे निवृत्तीचा अर्ज केला आणि सर्व पदांचे राजीनामे देत असल्याच कळवलं. मंडळानं तातडीनं त्यांची विनंती मान्य केली आणि त्यांना सर्व जबाबदारीतून मुक्त केलं. संदीप बक्क्षी हे बँकेचे नवे MD आणि CEO असतील.
या निर्णयानंतर बँकेच्या शेअर्सचे भाव तीन टक्क्यांपेक्षा जास्त वधारले आहेत. चंदा कोचर यांनी व्हिडीओकॉन कंपनीला 3250 कोटींचं कर्ज नियमबाह्य पद्धती दिलं होतं. नंतर व्हिडीओकॉन कंपनीने ते कर्ज बुडवलं. ही माहिती बाहेर आल्यानंतर कोचर यांच्या कार्यपद्धतीवर आणि हेतूवरच टीका होऊ लागली.
कोचर यांनी कुठलीही काळजी न घेता किंवा खात्री न करता एवढं मोठं कर्ज दिलच कसं असे प्रश्न विचारण्यात येवू लागले. नंतर चौफेर टीका होऊ लागल्याने त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं. चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या Nu-power या कंपनीला व्हिडीओकॉनकडून दोन कोटी रूपये देण्यात आले होते अशी माहिती पुढे आल्यानं हे कर्ज नेमकं कशासाठी दिलं होतं असे प्रश्न विचारले जावू लागले.
या प्रकरणामुळे बँकेच्या विश्वसनियतेवरच प्रश्नचिन्ह लागलं होतं. कोचर यांच्या राजीनाम्यामुळे आता टीकेची धार कमी होण्याची शक्यता आहे. चंदा कोचर आणि त्यांच्या कुटूंबियांची या प्रकरणी चौकशीही सुरू आहे.
अधिक वाचा : बँक ऑफ महाराष्ट्र 51 शाखा बंद करणार
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola