चांगलवाडी (प्रतिनिधी)- ग्रामपंचायत हद्दीतील जि.प.शाळेसमोरील रस्त्याची परिस्थिती पाहता शेतरत्या सारखी झाली आहे.गावातील हा रस्ता गावात येण्याकरिता मुख्य रस्ता आहे आणि महत्वाचे म्हणजे हा रस्ता जि.प.शाळेसमोर असून या रस्त्यावर पूर्णपणे घाण साचलेली आहे,आरोग्याच्या दुष्टीकोनातून हा रस्ता हानिकारक झालेला आहे,तसेच या रस्त्यावरून ये-जा करताना शाळेतील मुलांना खूप त्रास सहन करावा लागतो तसेच पावसाळ्यात हा रस्ता जास्त प्रमाणात बंद राहतो आणि शाळेतील मुलांची गैरसोय होते.तसेच नाली दुरुस्ती केलेली नसल्यामुळे गावातील सांडपाणी या रस्त्यावर जमा होते.या रस्त्यामुळे सर्वात जास्त त्रास हा विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो.
या रस्त्याकरिता गावातील जि.प.शाळेच्या मुख्यध्यापकांनी ग्रामपंचायतीला रितसर अर्ज केलेला आहे.तसेच प्रहार जनशक्ती पक्ष शाखा चांगलवाडी ह्यांनी पण रस्ता दुरुस्ती साठी अर्ज केलेला आहे तसेच या महिन्या मध्ये दुर्गा महोत्सव आहे आणि हाच मुख्य रस्ता असून दुर्गा महोत्सव मंडळाने पण रस्ता दुरुस्ती साठी अर्ज दिलेला आहे.पण ग्रामपंचायत अजून पर्यंत कोणतीही कार्यवाही केलेली नाही.विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या आणि शिक्षणाच्या दुष्टीने ग्रामपंचायत प्रशासनाने तसेच आरोग्य विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
अधिक वाचा : अकोला पोलीस तर्फे कौलखेड येथील श्रीराम विद्यालय येथे SWAS टीमची कार्यशाळा संपन्न
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola