पाथर्डी(शैलेश नायकवाडे): प्रहार जनशक्ती पक्ष पाथर्डी येथील अपंग बांधवांना निधी खर्च करण्या बाबत आणि आठवडी बाजार कडील महिला सार्वजनिक शौचालय दुरुस्ती करणे बाबत मा.सरपंच साहेब व ग्रामविकास अधीकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले.
पाथर्डी येथील गेल्या काहि वर्षा पासून अपंग निधी हा खर्च झाला नाही .त्यामुळे अपंग बांधवांना यातील पुरेशी महिती नसून तो निधी ग्रामपंचायत मध्ये तसाच जमा पडून होता .त्यामुळे प्रहार ने हा निधी अपंग बांधवाना वाटप करावा असे निवेदन देण्यात आले .व महिलांसाठी बांधलेले गावातील सार्वजनिक शौचालय नादुरुस्त असलेले शौचालय त्याची दुरुस्ती व्हावी.महिला वर्गाना शौचालयची कूचम्बणा होत असल्याने या कडे गांभीर्याने लक्ष द्यावे .हे ही या निवेदनातून सांगण्यात आले .त्यावर सरपंच साहेब नी या दोन्ही बाबी कडे आम्ही जातीने लक्ष देऊ व सर्व अनुशेष निधी या महिन्याला लवकर लवकर अपंगांना प्रधान करू असे आश्वासन दिले.
यावेळी उपस्थित प्रहार जनशक्ती पक्ष तेल्हारा तालुका युवक अध्यक्ष प्रफुल दबडघाव, पाथर्डी सर्कल अध्यक्ष प्रमोद तायडे तसेच सरपंच गजेंद्र वसो,उपसरपंच प्रकाशजी ऊगले आणि सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते व अपंग बांधव उपस्थित होते.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola