मुंबई: मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेता संतोष मयेकरचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय. अंधेरीतील राहत्या घरी झोपेतच त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला.
आपल्या अभिनयाच्या जोरावर संतोषनं मराठी रंगभूमीवर स्वतःचं स्वतंत्र स्थान निर्माण केलं होतं. भद्रकाली प्रॉडक्शनच्या ‘भय्या हातपाय पसरी’ या नाटकातील उत्तर भारतीयाच्या भूमिकेबद्दल त्याचं प्रचंड कौतुक झालं. या भूमिकेनंतर त्याला खऱ्या अर्थाने नावलौकिक मिळाला.
भद्रकालीचे सर्वेसर्वा मच्छिंद्र कांबळी यांच्या निधनानंतर संतोषने तात्या सरपंच बनून ‘वस्त्रहरण’चे काही प्रयोग केले.
‘वस्त्रहरण’च्या वैभवशाली ५०००व्या प्रयोगातही तात्या सरपंच साकारण्याचं शिवधनुष्य त्याने लिलया पेलून दाखवलं होतं. त्याशिवाय अनेक मराठी मालिका आणि सिनेमांमध्येही त्याने अभिनय केला होता.
त्याच्या आकस्मिक निधनामुळे मराठी रंगभूमीवरील एक सच्चा रंगकर्मी हरपल्याची भावना व्यक्त होतेय. सकाळी दहा वाजता त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola