अकोट (कुशल भगत) : काल दि.01/09/2018 ला नरवीर तानाजी मालुसरे व्यायाम शाळा येथे जिम चे साहित्य अनुलोमने केलेल्या पाठपुराव्यामुळे 5 लाखाचे साहीत्य आज रोजी जिल्हा क्रिडाअधिकारी यांच्या मार्फत चोहोट्टा बाजार येथे दाखल झाले अनुलोम च्या सर्व चोहोट्टा टीम सदस्यांचे मनःपूर्वक आभार..यामुळे गावातील युवकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
योगा योगाने 2 ऑक्टोबर आज गांधी जयंती आली. याचे औचित्य साधून आज नरवीर तानाजी मालुसरे व्यायाम शाळेचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यासाठी गावातील युवकांनी पुढाकार घेत. एक कदम स्वछता की और पाऊल ठेऊन सर्व परिसर स्वच्छ केला.
काही ठिकाणी पैशाच सर्व काही नसतो,तयारी असेल तर आपण कुठलेही काम पूर्णत्वास नऊ शकतो.त्याचेच एक उदाहरण आज चोहोट्टा बाजार परिसरातील युवकांनी त्यांनी केलेल्या आजच्या स्वछता अभियानातून दिसून आले.
यामध्ये प्रामुख्याने धीरज वडाळ, रामा मोरे, यांनी तन,मन धनाणी काम केले तसेच पंकज बुंदे,बलवंत काकडे,प्रज्वल बुंदे, गोपाल सिरसाट,अमर वडाळ,शिवा अडबोल,गणेश प्र.वडाळ,ज्ञानेश्वर बुंदे,सुरज बुंदे,मयूर डांगरे,अजय मो.बुंदे, पवन ग.बुंदे,विकास काकडे, ओमप्रकाश मुकुंदे, ओम मानकर, रामा गोरले,आशुतोष तळोकार, गोलू मुकुंदे, मंट्टू उमाळे यांच्या पुढाकाराने स्वच्छता अभियान यशस्वी रीत्या पार पडले.
महात्मा गांधी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी एक प्रयत्न स्वच्छतेसाठी करून खरी जयंती नरवीर तानाजी मालुसरे व्यायाम शाळेतील युवकांनी साजरी केली.- सलाम त्यांच्या या कार्याला
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola