लेजर फिजिक्सच्या अभूतपूर्व शोधांसाठी यंदाचा (२०१८) भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार तिघा शास्त्रज्ञांना विभागून देण्यात आला आहे. आर्थुर अश्किन, जेरार्ड मौरु, डोना स्ट्रिकलँड यांना भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला असल्याचे आज द रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसने जाहीर केले.
अमेरिकेचे अश्किन यांना नोबेल पुरस्काराची अर्धी रक्कम दिली जाणार आहे. तर उर्वरित अर्धी रक्कम अन्य दोघा विजेत्यांना दिली जाणार आहे. दरम्यान, कॅनडातील ओंटारियो विद्यापीठाच्या संशोधक स्ट्रिकलँड या ५५ वर्षानंतर नोबेल पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या महिला शास्त्रज्ञ बनल्या आहेत. याआधी १९६३ मध्ये न्युक्लियर स्ट्रक्चर शोधासाठी मारिया मेयर यांना भौतिकशास्त्राचे नोबेल मिळाले होते.
कॅन्सर थेरपी संशोधनासाठी अमेरिकेचे जेम्स ॲलिसन आणि जपानचे तासुकू होंजो या दोघा शास्त्रज्ञांना काल (सोमवार) नोबेल जाहीर झाला करण्यात आला होता. आज भौतिकशास्त्र क्षेत्रातील नोबेलची घोषणा करण्यात आली.
अधिक वाचा : जेम्स एलिसन, तासुकू होंजो यांना मेडिसिनचा नोबेल पुरस्कार जाहीर
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola