आकोट (प्रतिनिधी) :- गेल्या सहा दिवसांपासून प्रहार जनशक्ती पक्षाचे अकोला जिल्हा अध्यक्ष तुषार पुंडकर यांनी आकोट येथील श्री शिवाजी महाराज चौकात शेतकरी,दिव्यांग व्यक्ती,सर्वसामान्य नागरिक यांच्या मागण्यांबाबत बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते.गेल्या दोन दिवसांत महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मागण्यांच्या पूर्ततेसाठी अविरत प्रयत्न करून त्यापैकी काही मागण्या पूर्ण केल्या तर काही येत्या काही दिवसांत पूर्ण करण्याचे लेखी दिले आहे.
त्यामुळे प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन व सणा सुदीच्या दिवसांत प्रशासनावरील ताण आणखी न वाढविता बेमुदत आंदोलन आज मागे घेण्यात आले.
दिनांक २७/०९/२०१८ भगतसिंग याच्या जयंतीचे औचित्य साधून अन्नत्याग आंदोलनाला सुरवात करण्यात आली शेतकरी,दिव्यांग व्यक्ती,सर्वसामान्य नागरिक यांच्या मागण्यांबाबत बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते १० मागण्या करिता हे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनाच्या ४ दिवसी- तुषार पुंडकर यांच्या तब्येतीची तपासणी सरकारी डॉक्टरांनी केली असता उपोषनाच्या दिवसी ६८ किलो असलेले वजन ५९ किलो वर आले तर किटोन व्हॅल्यू वाढलेली आढळली त्यामुडे त्यांना भरती होण्याचा डॉक्टराणी सला दिला पण तुषार पुंडकर आपल्या निर्णय वर ठाम राहिले ढासळती प्रकृती व त्यांच्या या अन्नत्याग आंदोलनाला विविध स्तरातून मिळत असलेला पाठिंबा व बाळापूर, अकोला, तेल्हारा व मुर्तिजापूर येथे आंदोलनाच्या समर्थनार्थ निवेदने दिल्या गेलीत तर आकोट तालुक्यातील मुंडगाव,आसेगाव, चोहोटा बा. व बळेगाव या गावांमध्ये कँडल मार्च काढण्यात आला.तर तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींनी आंदोलनाला पाठिंबा दिला यासर्व बाबीचा दबाव प्रशासनावर होता ४ आणि ५ दिवसी प्रशासनाने युद्ध स्तरावर पावले उचलून प्रहार पधादीकारी याच्या सोबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली यामध्ये खलील माग्याण्यावर वर चर्चा करून पूर्तता करण्यात आली व तसे लेखी देण्यात आले
पिक विमा कंपनीच्या प्रतिनिधींची होणार नियुक्ती , भूमिहीन , शेतकरी , विधवा , अपंग यांना मिडणार राशन कार्डवर धान्य तसेच शेतकऱ्यांच्या मागण्याला पण मंजुरी.
१) नाफेड मार्फत मुंग व उडीत खरेदी लवकर सुरू करणार.
२) पीक विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींची होणार ७ तालुक्यात नियुक्ती.
३) नाफेड मार्फत तूर व हरभरा खरेदी केलेल्या मालाची रक्कम त्वरित देण्यात येणार.
४) बोंड अळीचे थकीत अनुदान त्वरित देण्याबाबत शासन स्थरावर प्रस्ताव पाठवणार.
५) नाफेड मार्फत तूर व हरभरा नोंदणी केलेल्या शेतकऱ्याची १००० रुपये अनुदानाची रक्कम त्वरित देण्याबाबत शासनाला प्रस्ताव सादर.
६) मुद्रालोणची प्रलंबित प्रकरणे त्वरित निकाली काढणार.
७) भूमिहीन, राशन कार्ड धारक तसेच शेतकरी व विधवा,दिव्यांग,दुर्धर आजारी यांना लवकरात लवकर धान्य सुरू करण्यात येणार.
८) पंतप्रधान घरकुल योजने अंतर्गत घरकुल लाभार्थीना घरकुलासाठी लवकरात लवकर जागा उपलब्ध करून देणार.
९) नविन राशन कार्ड , दुय्यम राशन कार्ड तसेच राशन कार्डमधील नाव कमी करणे किंवा नाव समाविष्ट करण्यासाठी काल मर्यादा शासनाने ठरवून दिली आहे. त्या काल मर्यादाचे फलक पुरवठा विभागात लावण्यात येणार.
१०) दिव्याग्याच्या हक्काचा असलेला ५ % निधी त्वरित वितरित करणार.
मागण्याची पूर्तता झाल्या नंतर आज गांधी जयंती दिनी उपोषनाची सांगता करणयात आली दोन्ही डोळ्यांनी अंध असलेले पिता पुत्र महादेव खडेकार व सुरेंद्र खडेकार या दिव्यांग व्यक्तिच्या हस्ते मोसंबीचा रस घेऊन “अन्न त्याग” आंदोलनाचा समारोप करण्यात आला. यावेडी आकोट पो. स्टे. चे ठाणेदार गजानन शेळके , माजी नगर अध्यक्ष रामचंद्र बरेठीय, माजी जिल्हा परिषत उपाध्यक्ष गजानन पुंडकर , सरपंच संगटनेचे अध्यक्ष बाळासाहेब आवारे , डॉ. जपसरे यासह पधादीकरी व कार्यकर्ते आणि शेतकरी शेतमजूर याची मोठया प्रमाणात उपस्थित होती. आंदोलना ची भूमिका निखिल गावंडे यांनी विषद केली संचालन अनंत गावंडे यांनी केले .
कुलदीप वसु , सागर उकंडे , अवि घायसुंदर , राहुल देशमुख, विशाल भगत , गणेश गावंडे , संदीप मर्दाने , किरण साबळे,निखिल दोड , रितेश हडोळे, अचल बेलसरे , छोटू चोधारी, जीवन आखरे , चेतन नाचणे , सुशील तायडे आदी कार्यरते उपस्तीत होते उपोषनाची यशवी सांगता फटाके पोडून व ढोल तासे वाजवून करण्यात आले तुषार पुंडकर याना पुढील वैधकीय उपचारा करिता डॉ. जपसरे याच्या दवाखान्यात भरती करण्यात आले.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola