नवी दिल्ली : कर्जमाफी, उसाला योग्य दर आणि अन्य मागण्यांसाठी हजारो शेतकऱ्यांनी भारतीय किसान संघटनेच्या नेतृत्वाखाली आज दिल्लीत धडक देण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकऱ्यांना आज उत्तर प्रदेश आणि दिल्लीच्या सीमेजवळ रोखण्यात आले. गाजीपूर सीमेजवळ पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये जोरदार धुमचक्री झाली.
शेतकऱ्यांना हटविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार आणि पाण्याचे फवार मारले. तसेच अश्रुधूरांचा मारा करण्यात आला. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बळाचा वापर करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना रोखण्यासाठी बॅरिकेटस लावण्यात आले होते. हे बॅरिकेटस शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या साह्याने ढकलण्याचा प्रयत्न केला. यानंतर शेतकऱ्यांनी रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार आणि पाण्याचा वापर केला.
#WATCH Visuals from UP-Delhi border where farmers have been stopped during ‘Kisan Kranti Padyatra’. Police use water cannons to disperse protesters after protesters broke the barricades pic.twitter.com/9KUwKgvrwW
— ANI (@ANI) October 2, 2018
शेतकऱ्यांचा पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर यमुनापार भागात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. तसेच उत्तर प्रदेशातून दिल्लीला जाणारे सर्व रस्ते बंद केले आहेत. विविध मागण्यांसाठी किसान क्रांती पदयात्रा २३ सप्टेंबरपासून हरिद्वार येथून निघाली होती. मात्र, या पदयात्रेला दिल्लीच्या सीमेजवळ रोखण्यात आले.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola