तेल्हारा (योगेश नायकवाडे): ‘एमडी’ ला प्रवेश मिळवून देतो,असे सांगून दिल्ली येथील युवकाने एक लाख रुपयाची फसवणूक केल्याची तक्रार तेल्हारा शहरातील राम नगरात राहणाऱ्या सुभाष नऱ्ही काकड यांनी १ ऑक्टोबर सोमवार रोजी तेल्हारा पोलिसात दिली.पोलिसांनी या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.रामनगरातील रहिवासी सुभाष काकड यांचा मुलगा रोहिल एमबीबीएस झाला असून,त्याला ‘एमडी’ साठी प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न चालू होते.
अशातच एके दिवशी दिल्ली येथून रोहिलच्या मोबाईलवर अभिनव मिश्राचा फोन आला,तुला प्रवेश मिळवून देतो असे म्हणून काकड यांचा विश्वास संपादन केला.त्यासाठी रोहिलला त्याने ऑनलाईन एटीएम द्वारे व आरटीजिसने १ लाख रुपये दोन टप्यास भरण्यास सांगितले.त्यानुसार १६ फेब्रुवारी २०१८ व २६ फेब्रुवारी २०१८ रोजी ती रक्कम रोहिल काकड ने दोन टप्यात भरली.परंतु एमडीच्या अंतिम यादीत नाव न आल्याने फसवणूक झाल्याचे समजले.वारंवार पैशाची मागणी काकड कुटुंबीयांनी अभिनव मिश्र यांच्याकडे केली.परंतु कुठलाही फायदा न झाल्याने सोमवार १ ऑक्टोंबर २०१८ रोजी रोहीलच्या वडिलांनी तेल्हारा पोलिसात तक्रार दाखल केली.याप्रकरणी तेल्हारा पोलिसांनी सुभाष काकड यांच्या तक्रारी वरून दिल्ली येथील अभिनव मिश्रा विरुद्ध कलम ४२० नुसार फसवणुकीचा गोन्हा दाखल केला आहे.
अधिक वाचा : तेल्हारा शासकीय १०८ रुग्णवाहिकेत रुग्णांची गैरसोय; आरोग्य विभागाची लक्ष देण्याची गरज
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola