मुंबई : आशिया चषक जिंकणा-या रोहित शर्मासाठी आणखी एक खूशखबर आहे. आयसीसीकडून जारी फलंदाजांच्या ताज्या वनडे रँकिंगमध्ये रोहितने मोठी झेप घेतली आहे. रोहित शर्मा फलंदाजांच्या वन डे रँकिंगमध्ये प्रथमच दुस-या क्रमांकावर पोहोचला आहे. रोहितच्या आधी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आहे. त्यामुळे वन डे फलंदाजांच्या रँकिंगमध्ये पहिल्या आणि दुस-या क्रमांकावर आता भारतीय फलंदाजांचा कब्जा झाला आहे.
विराट कोहलीच्या खात्यात ८८४ गुण आहेत, तर रोहितच्या नावावर ८४२ गुण आहेत. या यादीत तिस-या क्रमांकावर ज्यो रुट (८१८), चौथ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर (८०३) आणि पाचव्या क्रमांकावर शिखर धवन (८०२) आहे. रोहित शर्माने नुकत्याच झालेल्या आशिया चषकात १०५.६६च्या सरासरीने ३१७ धावा केल्या.
रोहितशिवाय फॉर्मात असलेल्या शिखर धवनलाही चार स्थानांचा फायदा झाला आहे. तो आता पाचव्या क्रमांकावर आला आहे. धवनने आशिया चषकात पाच डावांमध्ये ३४२ धावा केल्या, यामध्ये दोन शतकांचा समावेश आहे. धवन आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या वॉर्नर यांच्यात केवळ एका गुणाचा फरक आहे.
त्यामुळे सध्या बंदीची कारवाई भोगत असलेल्या वॉर्नरवर मात करत धवन पुढे जाईल यात शंका नाही. जसप्रीत बुमराह गोलंदाजांच्या यादीत पहिल्या स्थानावर कायम आहे. त्याच्या खात्यात ७९७ गुण आहेत. आशिया चषकात दहा बळी घेणा-या कुलदीप यादवने कारकिर्दीत पहिल्यांदाच ७०० गुण घेत तिस-या क्रमांकावर झेप घेतली. दुस-या स्थानावर अफगाणिस्तानचा स्टार खेळाडू रशिद खान (७८८) आहे.
अधिक वाचा : रोहित-शिखरनं मोडला सचिन-सेहवागचा विक्रम
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola