अकोला (योगेश नायकवाडे) : अकोला स्टेट बँकेच्या मुख्य शाखेमध्ये क्रेडीट कार्ड चा अर्ज भरीत असताना चोरट्याने कापडाच्या थैलीत ठेवलेली ५० हजार रुपयांची बँग लंपास केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली.या प्रकरणी सिव्हील लाईन पोलिसांनी गुन्हा दखल केला आहे. अकोट फैल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील म्हातोडी येथील रहिवासी असलेले रविंद्र जगन्नाथ पाठक वय ४८ हे टावर चौकातील एसबीआय च्या मुख्य शाखेतून ५० हजार रुपये काढण्यासाठी आले होते.त्यांनी क्रमांक ३ च्या काउंटरवर स्लिप भरली.२०० रुपयाच्या २५० नोटा असे एकूण ५० हजार रुपये त्यांना देण्यात आले.ते पैसे असे त्यांनी छोटया बँग मध्ये टाकून ती बँग कापडाच्या थैलीत टाकली,त्यानंतर ते तेथून क्रेडीट कार्ड साठी अर्ज भरण्यासाठी गेले.अर्ज भरत असताना त्यांच्या थैलीतील ५० हजार रुपयांची बँग चोरट्यांनी काढून घेतली.ते बँकेतून जाण्यसाठी निघाले असता थैली हलकी वाटली.त्यांनी थैलीची पाहणी केली असता बँग मिळून आली नाही. सगळीकडे त्यांनी शोध घेतला असता काळी बँग मिळून न आल्याने त्यांनी सिव्हील लाईन पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली.पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.
अधिक वाचा : केंद्र शासनाच्या पथकाने घेतले अकोल्यातील दुधाचे नमुने,’एफएसएसएआय’ चे पथक धडकल्याने विदर्भात खळबळ
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola