आकोट (प्रतिनिधी): अकोट येथे दि.२७ सप्टेंबर २०१८ रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे अकोला जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांनी शेतकरी, शेतमजुर, विधवा ,दिव्यांग यांच्या विविध मागण्यासाठी शिवाजी महाराज चौक अकोट येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरु केले असुन आज ५ दिवशीही आंदोलन सुरच आहे दरम्यान तालुक्यासह जिल्ह्यातील सामाजिक,व राजकीय,मान्यवरानी व अनेक सामाजिक सघंटनाचे पदधिकाऱ्यानी भेटी व समर्थन दिले तसेच आकोट तालुक्यातील ५५ गा्मपचांयतीनेे समर्थन पत्र दिले असुन आंदोलनाला विविध स्तरातून पाठिंबा मिळाला बाळापूर, अकोला, तेल्हारा मुर्तिजापूर आंदोलनाच्या समर्थनार्थ निवेदने व अकोट तालुक्यातही मुंडगाव आसेगाव, चोहोटा बळेगांव कँडल मार्च, काढुन समर्थन करण्यात आले आहे आकोटचे उपविभागीय महसूल अधिकारी उदय राजपूत हे गेल्या दोन दिवसांपासून पुंडकर यांच्या संपर्कात असून त्यांच्या मागण्यासंदर्भात संबंधित विभागांच्याअधिकाऱ्यांशी संपर्क साधून मागण्यांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करीत आहे. दरम्यान आज उपोषणाच्या पाचव्या दिवशी आकोट शहरातील अनेक मान्यवरांनी उपोषण मंडपाला भेट देऊन तुषार पुंडकर यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.यांमध्ये आकोट नगर पालिकेचे नगराध्यक्ष हरिनारायन माकोडे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हिदायत पटेल,माजी नगराध्यक्ष प्रा.संजय बोडखे,तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रशांत पाचडे,आकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील गावंडे, व्यापारी,अडते धान्य असोसिएशनचे सदस्य,टिपू टायगर ग्रूप, कामगार संघटना,शंभू सरकार ग्रुप,बाळकृष्ण बोन्द्रे,सदस्य जि.प.अकोला,काशीराम साबळे,भारिप बहुजन महासंघ,आकोट तालुका कृषी व्यावसायिक संघ,जगदंबा ग्रुप,रास्त भाव धान्य दुकानदार संघ,अकोला जिल्हा सरपंच संघटना,दिगंबर सोळंके,आदिवासी संघटना,ब्रह्मकुमार पांडे,छावा संघटना,गजानन पुंडकर माजी उपाध्यक्ष जि.प. अकोला,संजय मरगाये ,माजी सरपंच गुल्लरघाट,गजानन बोरोकर,लोकजागर मंच, संत सेना महाराज सामाजिक संस्था आकोट,अशोक साबळे,माजी सरपंच तरोडा,विराट प्रतिष्ठांन ,जगदंब ग्रुप,रुईखेड,शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ऍड.गजानन पुंडकर,डॉ.अभय पाटील यांचेसह ग्रामीण भागातील विविध बचत गटांच्या महिलांनी उपोषण मंडपाला भेट देऊन तुषार पुंडकर यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांची अशीही असेवंदनशिलता…..!
अकोट येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरु असताना व दुसरीकडे शेतकरी नाफेडच्या खरेदीसाठी नाव नोंदकरीता पोलीसाच्या लाठ्या खात होते तर अकोट मतदार सघांचे आमदार प्रकाश भारसाकळे हे अकोट शहरात येऊन विरोधी पक्षाच्या वाढदिवसाला हजेरी लावली परंतु मतदार सघांचे लोकप्रतिनिधी या नात्याने आंदोलन स्थंळाला भेट दिली नाही व शेतकरी यांची विचारपुस करणे योग्य वाटले नाही त्यामुळे अकोट मतदार सघांतील नागरीकात प्रकाश भारसाकळेना निवडुन देऊन चुक केल्याची चर्चा जोरात सुरु आहे.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola