अकोला (शब्बीर खान) – सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या खरब रोड येथील रेल्वे रुळावर एका ३० वर्षीय अनोळखी युवकाचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. खरप रोडवरील रेल्वे रूळावर एका 30 ते 32 वर्षे वयोगटातील युवकाचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत पडून असल्याची माहिती सिव्हिल लाईन्स पोलिसांना मिळाली. या माहितीवरून सिव्हिल लाइन्स पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर पंचनामा करून मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. मात्र सदर युवकाची ओळख पटली नसून या मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन सिव्हिल लाइन्स पोलिसांनी केले आहे.
अधिक वाचा : एसटी बसने दिली बैलगाडीला धडक; शेतकरी ठार, दोन जखमी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola