एटीएममधून एकावेळी काढता येणाऱ्या रकमेची मर्यादा स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI) निम्म्यानं कमी केली आहे. त्यामुळं स्टेट बँकेच्या एटीएममधून एकावेळी आणि दिवसभरात जास्तीत जास्त २० हजार रुपये काढता येणार आहेत. रक्कम काढण्यावरील ही मर्यादा ३१ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे.
देशभरात एटीएमचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. पण त्याचबरोबर एटीएम संबंधित गुन्ह्यांचे प्रमाणही वाढते आहे. ग्राहकांच्या एटीएमचा पीन चोरून किंवा त्यांना कोंडीत पकडून चोरटे एटीएमच्या माध्यमातून मोठी रक्कम लंपास करत असल्याचं निदर्शनास आलं आहे. एटीएममधून होणाऱ्या रोख रकमेच्या या चोरीला आळा घालण्यासाठी स्टेट बँकेनं हे पाऊलं उचललं आहे.
‘एटीएममधून काढत्या येणाऱ्या रकमेवर अधिकाधिक निर्बंध घालण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामुळं एटीएम फ्रॉडचे प्रमाण कमी होईल. याआधी अनेक आंतरराष्ट्रीय बँकांनी एटीएमवर निर्बंध घालून फ्रॉड्सचे प्रमाण कमी केले आहे,’ अशी माहिती स्टेट बँकेचे व्यवस्थापकीय संचालक पी. एन. गुप्ता यांनी दिली. यामुळं कॅशलेस व्यवहारांनाही चालना मिळेल, अशीही चर्चा आहे.
अधिक वाचा : इराणकडून नोव्हेंबरपासून तेल खरेदी बंद? कंपन्यांनी ऑर्डरच दिल्या नाही
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola