मूर्तीजापुर ( प्रतिनिधी ): राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीचा मेळावा गुरुवारी ता.२७ रोजी पटवारी काँलनी येथील संत राधे राधे महाराज सत्संग सभागृहात संपन्न झाला. मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा चित्राताई वाघ याची उपस्थितीती होती. यामेळाव्यात महीला सक्षमीकरण आणि महागाई, गँस, इंधन दरवाढ या मुदयावर राज्य सरकारला धारेवर धरले.आणि आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक उमेदवार निवडून आणुन पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी प्रयत्न करावे असे आव्हान प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी केले. मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून प्रवक्त्या डाँ. आशा मिरगे,प्रदेश सचिव श्रीमती मंदाताई देशमुख, महिला जिल्हाअध्यक्ष पदमा अहेरकर,शहर अध्यक्षा सुनंदा नवघरे,नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा अलिया तब्बसुम नासीरोददीन, राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोला जिल्हाअध्यक्ष संग्राम गावंडे, राष्ट्रवादी अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष निजाम इंजिनिअर, समाजसेवक रवी रमेशचंद्र राठी,महिला तालुका अध्यक्षा रजनी पवार, बाशिटाकळी तालुका अध्यक्ष सुनिता लोणाग्रे,लता वर्मा, छाया डोंगरे,उजवलाताई बोळे, रंजना दुबे, मंजु गावंडे, जिजा इंगोले, सोनु शिंगारे,वंदना आवळे,श्रीकृष्ण बोळे यांची प्रमुख उपस्थितीती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रजनी पवार यांनी केले. यावेळी या महिला मेळाव्यात तालुक्यातील काही कार्यकर्ता यांच्या नियुक्त्या करून त्यांना नियुक्ती पत्र प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला तालुक्यातील व शहरातील बहुसंख्येने राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्ते उपस्थित होते. मेळावा यशस्वीतेसाठी समाजसेवक रवि राठी, रायुंका तालुका अध्यक्ष श्रीधर कांबे,शहर अध्यक्ष अ.जावेद अ.बाकी, अमोल लोकरे,विशाल शिरभाते, राम कोरडे, सिद्धार्थ तायडे, निलेश अववलवार, अजय गोरले,अतुल गावंडे, मयूर वहीले,ज्ञानेश्वर महल्ले, ज्ञानेश्वर म्हसाये, अभय वैध,देवा ठोकळ, पवन गिरी, गोकूल फुके,सोपान घोरमोडे, पवन खेडकर, जयदीप कवळकर,राहुल भटकर, नौशाद भाई,गोपाल बुरघाटे,अमोल गावंडे, आदी महीला व पुरुष कार्यकर्ते यांनी परीश्रम घेतले.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola