अकोला: मतदार यादयाच्या पुर्नरिक्षण कार्यक्रम अंतर्गत अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघात आज दि. 29 सप्टेंबर रोजी मतदार नोंदणीची विशेष मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेतंर्गत जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी लक्क्ंड गंज येथील मनपा उर्दु शाळा व पोळा चौकातील मनपा उर्दु शाळेतील मतदान केद्रांला भेटी दिल्यात. आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या अडचणी जाणुन घेतल्या तसेच मतदान केंदस्तरीय अधिका-यांनी घरोघरी जावुन जमा केलेल्या नमुना फॉर्मची तपासणी केली व त्यातील त्रुट्याबद्दल जिल्हाधिकारी यांनी संबंधीतांना मार्गदर्शन केले.
निवडणुक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे निवडणुक प्रक्रीयेत सहभागी होणा-या प्रत्येकाची जबाबदारी असेते. तसेच निवडणुक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे शाळा शिक्षकांना निवडणुकीच्या कामात मतदान केंद्र स्तरीय अधिकारी म्हणुन काम दिल्या जाते. त्यांनी सदर काम प्रामाणिकपणे व चौखपणे बजावणे अनिवार्य आहे. या कामात कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा खपवुन घेतल्या जाणार नाही. असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. या कामात कुचराई करणा-या कर्मचा-यावर नियमाप्रमाणे सक्त कारवाई करण्यात येईल अशा इशारा त्यांनी दिला.
प्रत्येक मतदारांनी आपले कर्तव्य समजुन मतदारा यादीत आपले नाव तपासुन घ्यावे मतदार यादीत नाव नसल्यास जवळच्या मतदान केंद्रावर जावुन तेथील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची भेट घेवुन नमुना अर्ज क्रमांक 6 भरुन दयावा व आपले नाव मतदार सुचीमध्ये समाविष्ठ करावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. तसेच निवडणुक आयोगाच्या वेबसाईटवर जावुन ऑनलाईन नोंदणी करू शकता असेही त्यांनी सांगितले.
सध्या निवडणुक आयोगाचे निर्देशाप्रमाणे 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादयांच्या विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रमातंर्गत 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोंबर या कालावधीत जिल्हात मतदार नोंदणीची मोहिम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने वयाच्या 18 वर्ष पुर्ण केलेल्या पात्र मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ठ करण्यासाठी आज 29 सप्टेबर रोजी अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघात मतदार नोंदणीची विशेष मोहिम राबविण्यात आली.
या मोहिमेत मतदार यादीत नावेसमाविष्ठ करण्यासाठी मतदान केंद्र स्तरीय अधिकारी नमुना अर्ज घेवून घरोघरी जाणार असुन त्यांच्या सोबत महसुल अधिकारी व कर्मचारी जाणार आहेत.
तत्पुर्वी याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये संबंधीत बीएलओ व महसुल कर्मचा-यांना अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी आवश्यक त्या सुचना दिल्यात. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी वैशाली देवकर, भुसंपादन अधिकारी अनिल खंडागळे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार , अकोल्याचे तहसिलदार विजय लोखंडे, मुर्तिजापुरचे तहसिलदार राहुल तायडे, अकोटचे तहसिलदार विश्वनाथ घुगे, नायब तहसिलदार सतिश काळे, नायब तहसिलदार महेंद्र अत्रांम, यांची प्रमुख उपस्थिती होती.
निवडणुक आयोगाचे निर्देशाप्रमाणे 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादयांच्या विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रमातंर्गत 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोंबर या कालावधीत जिल्हात मतदार नोंदणीची मोहिम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने वयाच्या 18 वर्ष पुर्ण केलेल्या पात्र मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ठ करण्यासाठी 29 सप्टेबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या कालावधीत अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघात मतदार नोंदणीची विशेष मोहिम राबविण्यात आली .
या मोहिमेत पात्र मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ठ करण्यासाठी बीएलओ नमुना क्रमांक 6 घेवुन घरोघरी जाणार आहेत. यावेळी मतदार नोंदणीच्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी महसुल अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या सोबत राहणार आहेत. यासाठी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी आदेशाव्दारे मतदार नोंदणीच्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी महसुल अधिकारी आणि कर्मचारी यांच्या नेमणुका केलेल्या आहेत.