तेल्हारा(शुभम सोनटक्के): तेल्हारा लहान मुलाच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले असून तेल्हारा पोलीस स्टेशन अंतर्गत गेल्या पंधरा दिवसातलि तिसरी १५ वर्षीय अल्पवयीन मुलाने आत्महत्या केल्याची घटना आज खापरखेड येथे काही तासापूर्वी घडली.
तालुक्यात गेल्या पंधरा दिवसात तीन अल्पवयीन मुलांनी आत्महत्या केल्याने तालुका हादरला असून आज खापरखेड येथील १५ वर्षीय अजय प्रल्हाद पवार हा इयत्ता ८ वी मध्ये शिकत होता.आज दुपारी तो घरी होता तर त्याचे वडील पानटपरी चालवतात तर ते पानटपरी वर जाण्यापूर्वी मी काही वेळात येतो तू चारा घेऊन ये मग आपण चहा घेऊ असे म्हणून निघून गेले.तर अजय याची आई आजोबा वारले म्हणून तिथे गेलेली होती.आज दुपारी चार वाजेच्या दरम्यान अजय चे वडील घरी आले असता घरातील नाठीला अजय ने गळफास घेतलेला आढळला.अजय च्या वडिलांनी लगेच हालचाल करून वाचवण्याचा पर्यन्त केला मात्र तेल्हारा येथे दवाखान्यात घेऊन येत असताना रस्त्यामध्ये त्याची प्राणज्योत मावळली.खापरखेड येथील ही दुसरी घटना असून गेल्या १५ दिवसातील तिसरी घटना आहे.अजय च्या आत्महत्येने खापरखेड येथे हळहळ व्यक्त होत आहे.अजय ने आत्महत्येसारखे टोकाचे एवढ्या कोवळ्या वयात पाउल का उचलले याचा तपास ठाणेदार देवरे यांच्या नेतृत्वाखाली बिट जमादार नागोराव भांगे,सागर मोरे,विजय राजनकार करीत आहेत.