पातुर(सुनील गाडगे): प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय मध्ये बाह्य अस्वच्छतेच्या कार्यासोबतच मनुष्याच्या मनामधील व्यर्थ नकारात्मक हिंसा, द्वेष, वासनात्मक वृत्ती तामसिकता, इत्यादी स्वरूपाच्या मानसिक कचऱ्याच्या स्वच्छतेच्या कार्याला अध्यात्मिक महत्त्व देण्यात येते असे ब्रह्माकुमारीस पातुर शाखेच्या संचालिका ब्रह्माकुमारी लीना दीदी म्हणाल्या. त्या भारत सरकार द्वारा राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत मिशन कार्याच्या ब्रँड अँबेसेडर असलेल्या प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या मुख्य प्रशासक आदरणीय राज योगिनी जानकी दादींच्या नेतृत्वाखाली आयोजित स्वच्छ भारत अभियान कार्यक्रमात बोलत होते. त्या पुढे म्हणाल्या की ब्रह्मकुमारीस प्रत्येक शाखेमध्ये वैचारिक स्वच्छता, शुद्धता, पवित्रता, जीवनामध्ये धारण करण्यासंबंधीचे शिक्षण सामाजिक समाजातील प्रत्येक धर्म,जाती, पंथातील लोकांकरिता विनामूल्य शिकविल्या जाते याचा पातूरच्या नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा.
जुने बस स्टॅन्ड स्थित पोलीस स्टेशन समोर आयोजित या कार्यक्रमाला पातुर नगर परिषदेच्या अध्यक्षा सौ प्रभाताई कोथळकर, ठाणेदार श्री खंडेराव, नगर परिषदेच्या माजी उपाध्यक्ष सौ वर्षाताई बगाडे, पातुर शहर भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ वैशालीताई निकम, पत्रकार श्री राजाराम जी देवकर, प्राचार्य शेकवाले, ब्रह्माकुमारी लीना दीदी ब्रह्माकुमारी प्रभा दीदी, पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी, ब्रह्माकुमारीज सेवा केंद्राचे सर्व सदस्य व स्थानिक नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.पाहुण्यांचे स्वागत ब्रह्मकुमारी प्रभा दीदींनी केले तसेच कार्यक्रमाचे संचालन वआभार प्राचार्य अतुल विखे यांनी मानले.
सर्वप्रथम स्थानिक रवींद्र नगर, खानापूर रोड स्थित ब्रह्माकुमारी सेवा केंद्र पासून जनजागृती फेरी काढण्यात आली व पोलीस स्टेशन ते संभाजी चौक मार्गे टी के व्ही चौकापर्यंतचे हे अभियान राबविण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सर्व बिके भाऊ बहिणी परिश्रम केले.